फेब्रुवारी महिन्यात ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week 2022) साजरा केला जातो. या आठवड्यातील १२ फेब्रुवारी या दिवशी हग डे (Hug Day 2022) साजरा केला जातो. या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला मिठी (Hug Day) मारली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या जोडीदाराला २० सेकंद मिठी मारण्याचे अनेक फायदे आहेत. ते कोणते ते जाणून घेऊयात.
ताण जातो आणि मूड होतो मस्त – एक सुखद मिठी आपला मानसिक तणाव कमी करण्याबरोबरच आपली चिंता देखील कमी करते. जोडीदाराला २० सेकंद मिठी मारल्याने शरीरात बरेच बदल दिसून येतात. तुमच्या जोडीदाराला मिठी मारल्याने तणाव कमी होऊ शकतो. जसा तुमचा ताण कमी होतो, तसाच तुमचा मूडही ठिक होतो.
[read_also content=”आली लहर केला कहर – व्हॅलेंटाइन वीकमध्ये भडकली रागाची आग, लग्न मोडल्याच्या संशयातून मुलीने एक्स बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं https://www.navarashtra.com/crime/girlfriend-burnt-his-ex-boyfriend-for-breaking-her-marriage-with-another-boy-nrsr-236890.html”]
ब्लड प्रेशर होते कमी – १० मिनिटे हात धरणे किंवा २० सेकंद मिठी मारल्याने तुमच्या रक्तदाबाची पातळी खूप कमी होते. त्यामुळेच मिठी मारणे हे जितके रोमँटिक आहे तेवढेच ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
वेदना होतात कमी – जर तुम्हाला कुठेतरी वेदना होत असेल तर तुमच्या जोडीदाराला मिठी मारल्याने खूप आराम मिळतो. कारण मिठी मारल्याने तुमच्या शरीरात असे हार्मोन्स तयार होतात, जे वेदना कमी करण्याचे काम करते.
भीतीवर मात – एखाद्याला मिठी मारल्याने तुमची भीती खूप कमी होते. घाबरलेल्या अवस्थेत आपण एखाद्याला मिठी मारल्यास आपल्याला दिलासा मिळतो. मनात किंवा डोक्यात सुरू असलेल्या विचारांच चक्र थांबत. एखाद्या वाईट प्रसंगातून बाहेर निघण्याचा मार्ग एका मिठीतून मिळतो.