Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

140 देशात भ्रमण, 400 शहरं आणि 3 वर्षं समुद्रावरील आलिशान व्हिलामध्ये वास्तव्य; काय आहे ‘हि’ गोल्डन पासपोर्ट योजना?

Villa Vie Residences Cruise: व्हिला व्ही रेसिडेन्सने 'आशियाना इन द सी' नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये तुम्हाला गोल्डन पासपोर्ट मिळेल ज्या अंतर्गत तुम्ही 140 देश आणि 400 शहरांमध्ये प्रवास करू शकाल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 23, 2025 | 10:22 PM
Villa Vie’s Asiana in the Sea cruise offers a Golden Passport to 140 countries and 400 cities

Villa Vie’s Asiana in the Sea cruise offers a Golden Passport to 140 countries and 400 cities

Follow Us
Close
Follow Us:

Asiana in the Sea cruise : आजच्या काळात प्रत्येकजण जगभर प्रवास करण्याचं स्वप्न बाळगतो. पण वेळ, पैसा आणि संधी यामुळे अनेकांची ही स्वप्नं अधुरी राहतात. मात्र, आता एक क्रूझ कंपनीने तुमच्यासाठी अशी सुवर्णसंधी दिली आहे की ज्यामुळे तुम्ही ३ वर्षं सातत्याने जगभर फिरू शकणार आहात. ही ऑफर फक्त प्रवासापुरती नाही, तर ती तुमच्या संपूर्ण जीवनशैलीला नवी दिशा देणारी आहे. ‘Villa Vie Residences Cruise’ या कंपनीने “आशियाना इन द सी” (Aashiana in the Sea) नावाचा अनोखा कार्यक्रम सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना “गोल्डन पासपोर्ट” मिळेल. या पासपोर्टमुळे तुम्ही १४० देश आणि ४०० हून अधिक शहरांचा आनंद घेऊ शकाल.

 क्रूझवर ‘घर’ आणि जगभर प्रवास

कंपनीने ही योजना विशेषतः निवृत्त आणि जग पाहण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी आणली आहे. प्रवाशांना क्रूझवर एक स्थायी घरासारखी व्यवस्था मिळेल. त्यात जेवण, कपडे धुणे, घरकाम, मनोरंजन, इंटरनेट अशा सर्व सुविधा समाविष्ट आहेत. एवढंच नाही तर जेवणासोबत वाइन किंवा बिअरची मजाही उपलब्ध असेल. यातलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे, एकदा “गोल्डन पासपोर्ट” घेतला की तुम्हाला कोणतेही लपलेले शुल्क, पोर्ट टॅक्स किंवा अतिरिक्त फी भरावी लागणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अविश्वसनीय! कोस्टा रिका किनाऱ्यावर मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला ‘ऑरेंज शार्क; शास्त्रज्ञांनी दिले अनोखे स्पष्टीकरण

किती खर्च येणार?

गोल्डन पासपोर्टसाठी तुम्हाला ८७ लाख रुपयांपासून (USD 99,999) खर्च करावा लागेल. प्रत्येक प्रवासाचा कालावधी साधारण ३ ते ३.५ वर्षांचा असेल. दरम्यान, प्रत्येक बंदरावर जहाज २ ते ३ दिवस थांबेल, ज्यामुळे प्रवाशांना त्या ठिकाणाची ओळख करून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

या योजनेत वयाच्या गटांनुसार किंमत वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.

  • ९० वर्षांवरील लोकांसाठी पासपोर्ट ९९,००० डॉलर्समध्ये उपलब्ध.

  • ५५ ते ६० वयोगटासाठी सर्वात महाग पर्याय आहे, ज्याची किंमत जवळपास ३ लाख डॉलर्स (₹२.५ कोटी) आहे.

 क्रूझवरील आलिशान व्हिला

प्रवाशांसाठी क्रूझमध्ये विविध श्रेणीचे आलिशान व्हिला उपलब्ध आहेत:

  • इनसाईड व्हिला – $129,999 पासून सुरू

  • पोर्टहोल व्हिला – $149,999 पासून सुरू

  • ओशन व्ह्यू व्हिला – $169,999 पासून सुरू

  • बाल्कनी व्हिला – $329,999 पासून सुरू

  • डिलक्स बाल्कनी व्हिला – $379,999 पासून सुरू

  • व्हिला सुइट – $439,999 पासून सुरू

 

credit : social media

या व्हिलामध्ये आलिशान सुविधा, समुद्राचे सुंदर दृश्य आणि लक्झरी हॉटेलसारखा अनुभव मिळेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स

 आरोग्याची हमी

कंपनी प्रवाशांना दरवर्षी मोफत वैद्यकीय तपासणी करून देईल. निवृत्तीनंतर आरोग्याबद्दलची काळजी महत्त्वाची ठरते आणि ही सेवा गोल्डन पासपोर्टला अधिक आकर्षक बनवते.

जीवनशैली आणि प्रवासाचा संगम

व्हिला व्ही रेसिडेन्सेसचे सीईओ कॅथी व्हिलाल्बा म्हणतात “आयुष्य झपाट्याने पुढे जातं. बहुतेक लोकांना निवृत्तीनंतर एकच खंत राहते. जगभर प्रवास करण्याची संधी गमावली. गोल्डन पासपोर्टमुळे हे स्वप्न आता शक्य होतंय.” ३ वर्षं क्रूझवर राहत जगभर फिरणं हे अनेकांसाठी आयुष्यभराचं स्वप्न असतं. ‘Villa Vie Residences‘ ची ही ऑफर त्या स्वप्नाला साकार करण्याची एक सुवर्णसंधी आहे. निवृत्त लोकांसाठी तर हा खरोखरच नवा “जीवनप्रवास” ठरू शकतो.

Web Title: Villa vies asiana in the sea cruise offers a golden passport to 140 countries and 400 cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • private travels
  • travel experience
  • travel news

संबंधित बातम्या

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन
1

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर
2

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर

Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल
3

Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल
4

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.