• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Orange Shark With White Eyes Found Off Costa Rica

अविश्वसनीय! कोस्टा रिका किनाऱ्यावर मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला ‘ऑरेंज शार्क; शास्त्रज्ञांनी दिले अनोखे स्पष्टीकरण

Orange shark with white eyes : कोस्टा रिकाच्या मच्छिमारांनी एक विचित्र शार्क पकडला आहे, जो पाहून शास्त्रज्ञही चक्रावून गेले आहेत कारण या माशाच्या त्वचेचा रंग पूर्णपणे नारंगी आहे तर त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 23, 2025 | 03:14 PM
Orange shark with white eyes found off Costa Rica

अविश्वसनीय! कोस्टा रिका किनाऱ्यावर मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 'ऑरेंज शार्क; शास्त्रज्ञांनी दिले अनोखे स्पष्टीकरण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

orange nurse shark Costa Rica : समुद्र म्हणजे नेहमीच रहस्यांनी भरलेली एक अद्भुत दुनिया. खोल पाण्यात कोणते प्राणी लपलेले आहेत, त्यांचा आकार-रंग कसा आहे, हे आपण अनेकदा कल्पनाही करू शकत नाही. कोस्टा रिकामधील काही मच्छीमारांच्या जाळ्यात नुकताच असा एक प्राणी अडकला की ज्याने केवळ मच्छीमारांनाच नव्हे तर संपूर्ण वैज्ञानिक जगालाही अचंबित करून सोडले आहे. हा शार्क अगदी वेगळाच होता त्याची कातडी पूर्णपणे चमकदार नारिंगी तर डोळे पूर्णपणे पांढरे! पाहणाऱ्यांना तो जणू एखाद्या रहस्यमय पौराणिक प्राण्यासारखा वाटत होता. समुद्रातील सर्वसामान्य शार्कप्रमाणे त्याचा रंग करडा नव्हता, तर तेजस्वी केशरी होता.

वैज्ञानिकांनाही आश्चर्य

तज्ञ सांगतात की हा रंग आणि डोळ्यांचा बदल कोणत्याही अपघाती कारणामुळे झालेला नाही, तर तो एका अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक स्थितीचा परिणाम आहे. या शार्कमध्ये एकाच वेळी दोन वेगळ्या स्थिती आढळल्या

  1. झँथिझम (Xanthism) – ज्यात शरीरात पिवळसर रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार होते. यामुळे त्वचा गडद पिवळी किंवा नारिंगी दिसते. काही पक्षी, सरपटणारे प्राणी व मासे यात हे दिसून आले असले तरी शार्कमध्ये याचे उदाहरण जवळपास शून्य आहे.

  2. अल्बिनिझम (Albinism) – ही अशी स्थिती आहे ज्यात शरीरात मेलेनिन हे रंगद्रव्य तयार होत नाही. त्यामुळे डोळे व त्वचा पूर्णपणे पांढरी दिसते. सागरी प्राण्यांमध्ये हे अत्यंत विरळा आढळते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariffs : ट्रम्पची आर्थिक खेळी! अमेरिकेवरील $37.18 ट्रिलियनचे कर्ज फेडण्यासाठी हा भाला मोठ्ठा ‘Tariff’ तमाशा

एकाच प्राण्यामध्ये या दोनही स्थितींची एकत्रित उपस्थिती ही जगभरात नोंदलेली पहिलीच घटना असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.

Rare orange shark with ghostly white eyes captured in first-of-its-kind sighting pic.twitter.com/kMuultaItq

— Daily Mail US (@Daily_MailUS) August 18, 2025

credit : social media

दुर्मिळतेचे महत्त्व

२०२३ मध्ये एका नवविवाहित जोडप्याला समुद्रात पांढरा डॉल्फिन दिसला होता. त्या घटनेने जागतिक पातळीवर खळबळ माजवली होती. मात्र आता नारिंगी शार्कच्या शोधाने वैज्ञानिक विश्वात आणखी एक अद्भुत पान लिहिले गेले आहे. अशा प्राण्यांना नैसर्गिक परिस्थितीत जगणे फार कठीण असते. त्यांच्या चमकदार रंगामुळे शिकारी त्यांना सहज पाहू शकतात. तसंच, शिकार पकडताना देखील ते स्वतःच जास्त लवकर दिसतात, त्यामुळे त्यांना अन्न मिळवणे अवघड जाते. तरीही हा शार्क आजवर जिवंत राहिला आहे, हेच त्याच्या अस्तित्वाला चमत्कार ठरवते.

निसर्गाची अद्वितीयता

हा नारिंगी शार्क केवळ मच्छीमारांसाठी आयुष्यभर विसरता येणार नाही असा अनुभव ठरला नाही, तर वैज्ञानिक समुदायासाठीही मौल्यवान शोध ठरला आहे. अशा प्राणींच्या अभ्यासामुळे आपल्याला सागरी जैवविविधतेचा अधिक खोलवर अभ्यास करता येतो. निसर्ग किती प्रकारे जीवन घडवू शकतो, किती अद्वितीय रूपं देऊ शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक वेळी अशा घटना घडल्या की मानवाला समजते  अजूनही समुद्राच्या गाभ्यात असंख्य रहस्यं दडलेली आहेत आणि त्यांचा शोध घेणं म्हणजे निसर्गाशी संवाद साधण्यासारखं आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 1 Lakh To 100 Crore : बॉलीवूडचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! जाणून घ्या जॅकी श्रॉफचे 1 लाख कसे झाले 100 कोटी

चमत्कारापेक्षा कमी नाही…

कोस्टा रिकाच्या मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेला हा ‘नारिंगी शार्क’ आणि त्याचे पांढरे डोळे हा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. विज्ञानासाठी, निसर्गाच्या अनोख्या कलाकुसरीसाठी आणि आपल्यासारख्या जिज्ञासू मानवांसाठी ही घटना एक प्रेरणादायी कहाणी आहे. समुद्र कधीच आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही. तो नेहमीच आपल्याला काहीतरी नवीन दाखवतो, थक्क करतो आणि पुन्हा एकदा जाणवून देतो निसर्ग आपल्यापेक्षा कितीतरी मोठा आणि अद्वितीय आहे.

Web Title: Orange shark with white eyes found off costa rica

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • rare
  • secrets of deep ocean
  • viral photo

संबंधित बातम्या

श्रद्धेचा अद्भुत चमत्कार! काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर आढळला पांढरा घुबड; इवलेसे डोळे, गोंडस रूप अन् मनमोहक Photo Viral
1

श्रद्धेचा अद्भुत चमत्कार! काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर आढळला पांढरा घुबड; इवलेसे डोळे, गोंडस रूप अन् मनमोहक Photo Viral

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन
2

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार?  शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO
3

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार? शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO

‘Ring of Fire’ मधून बाहेर आला राक्षस! 1600 किमी धुराची नदी, NASAलाही बसला धक्का
4

‘Ring of Fire’ मधून बाहेर आला राक्षस! 1600 किमी धुराची नदी, NASAलाही बसला धक्का

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अविश्वसनीय! कोस्टा रिका किनाऱ्यावर मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला ‘ऑरेंज शार्क; शास्त्रज्ञांनी दिले अनोखे स्पष्टीकरण

अविश्वसनीय! कोस्टा रिका किनाऱ्यावर मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला ‘ऑरेंज शार्क; शास्त्रज्ञांनी दिले अनोखे स्पष्टीकरण

Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत; तब्बल 28 चाकूसह कोयतेही जप्त

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत; तब्बल 28 चाकूसह कोयतेही जप्त

साखर गुळाचा वापर न करता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी बनवा खजूर मोदक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

साखर गुळाचा वापर न करता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी बनवा खजूर मोदक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Horror Story: कोकणात रात्रीचा प्रवास जाम Danger! वडापावचे आमिष दाखवून बोलावले अन् केला अपघात, पण…

Horror Story: कोकणात रात्रीचा प्रवास जाम Danger! वडापावचे आमिष दाखवून बोलावले अन् केला अपघात, पण…

Pune Civic Poll Row:  पुणे महापालिकेतील प्रभागरचनेवरून महायुतीत मिठाचा खडा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर नाराजी

Pune Civic Poll Row: पुणे महापालिकेतील प्रभागरचनेवरून महायुतीत मिठाचा खडा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर नाराजी

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.