Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

Places To Visit : वेळ जातो पण आठवणी आणि अनुभव आपल्या नेहमी सोबत राहतात. वाढत्या वयात शारीरिक हालचाली कमी होत असल्याने फिरणं किंवा प्रवास करणं कठीण बनतं, त्यामुळे तरुणपणातच काही सुंदर आणि साहसी ठिकाणे फिरुन आली पाहिजेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2026 | 08:37 AM
Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

Follow Us
Follow Us:
  • तरुण वयात शरीर जास्त तंदुरुस्त असल्यामुळे साहसी आणि लांब प्रवासाचा आनंद सहज घेता येतो.
  • प्रवासामुळे ताण-तणाव कमी होऊन मन शांत आणि ताजेतवाने होते.
  • काही खास ठिकाणे अशी आहेत जी आयुष्यात एकदा तरी योग्य वयात अनुभवणे अधिक संस्मरणीय ठरते.
आजकाल लोक कामात इतके गुंतत चालले आहेत की त्यांना स्वत:साठीही वेळ काढता येत नाही. जसजसं वय वाढतं आपल्या शरीराची अवस्थाही बदलत जाते. ज्या गोष्टी तुम्ही तरुणपणात करु शकता त्या तुम्हाला क्वचितच नंतर करता येतील. वयाच्या तिशीपूर्वी तुम्ही शारीरिकदृष्ट्या सर्वाधिक तंदुरुस्त असता. ट्रेनमधील तासनतासप्रवासापासून ते ट्रेकिंगपर्यंत, तुमचे शरीर हे सर्व सहज पेलू शकते.त्यामुळे थोडा वेळ स्वत:साठीही काढा आणि देशातील काही चांगल्या ठिकाणी फिरुन या. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रवास हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा मानला जातो. प्रवासामुळे मन मोकळं होतं, नवीन गोष्टी पाहता येतात आणि यामुळे थकवा, ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. आज या लेखात आम्ही तुम्हाला देशातील काही अशा सुंदर ठिकाणांची माहिती सांगणार आहोत ज्यांना भेट देऊन तुम्ही तुमची ट्रीप संस्मरणीय करु शकता.

Amarnath Yatra 2026 : या तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या घरबसल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस

लेह-लडाख

जम्मू-काश्मीरच्या पूर्वेला, हिमालय पर्वतरांगेत हे ठिकाण वसले आहे. निसर्गप्रेमी आणि साहस प्रमींसाठी हे ठिकाण सर्वोत्तम मानले जाते. लडाखची जास्त उंची आणि कमी ऑक्सिजन पातळी सहन करण्यासाठी आपली शारीरिक क्षमता उत्तम असणे गरजेचे आहे. ज्यामुळे हे ठिकाण तरुणांसाठी परफेक्ट ठरते. जून ते सप्टेंबरचा काळ ठिकाणाला भेट देण्यासाठी परफेक्ट काळ मानला जातो.

स्पिती व्हॅली

स्पिती व्हॅली हे ठिकाण एक थंड वाळवंट म्हणून ओळखले जाते. वयाच्या तिशीआधी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. तिबेट आणि भारत यांच्यातील “मध्यभूमी” म्हणून ठिकाणाची ओळख आहे. शहराच्या गजबटापासून दूर इथे तुम्हाला स्वत:साठी वेळ काढता येईल. हे ठिकाण प्राचीन बौद्ध मठ, बर्फाच्छादित शिखरे, निळे आकाश आणि निवांत वातावरण यासाठी प्रसिद्ध आहे.

दार्जिलिंग

चहाच्या मळ्यांसाठी लोकप्रिय असलेले हे ठिकाण पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. चहाच्या मळ्यांमध्ये मैलोंमैल चालण्यासाठी तुमची शारीरिक क्षमता उत्तम असणे फार गरजेचे असते, ज्यामुळे तुमचे वय प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावेल. इथले आल्हाददायक हवामान मनाला वेगळेच सुख देऊन जाते.

पाँडिचेरी

भारताच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील एक केंद्रशासित प्रदेश आणि प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून पाँडिचेरीची ओळख आहे. इथे सर्किंग आणि स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेता येतो. इथे तुम्ही अनेक एक्टिव्हिटीजचा आनंद घेत आपल्या ट्रीपचा आनंद द्विगुणित करु शकता. फ्रेंच वसाहतकालीन इतिहास, संस्कृती आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी हे ठिकाण फार लोकप्रिय आहे.

Water Of Tears : देशातील या तलावाला ‘अश्रूंचं तलाव’ का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या

मेघालय

मेघालय हे ईशान्य भारतातील एक डोंगराळ ढगांचे निवासस्थान म्हणून याला ओळखले जाते, कारण इथे जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. इथे तुम्ही बांबू ट्रेक आणि खोल गुहांचा शोध घेऊ शकता. नैसर्गिक सौंदर्य, धबधबे आणि साहसी पर्यटनासाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

Web Title: Visit best places of india before you turn 30 travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • places to visit
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
1

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी
2

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास
3

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
4

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.