Chicken Cutlet Recipe : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही चिकनपासून ज्यूसी आणि क्रिस्पी असे चिकनचे कटलेट तयार करु शकता. संध्याकाळचा नाश्ता किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी ही एक परफेक्ट डिश ठरते.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
चिकन कटलेटची चव तुम्ही अनेकदा चाखली असेल.
पण हा पदार्थ तुम्ही कधी घरी बनवला आहे का?
फार मुबलक साहित्यापासून ही डिश तयार केली जाते.
चिकनपासून बनणारे विविध पदार्थ प्रत्येकाला आवडतात, त्यामध्ये चिकन कटलेट हा एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट स्नॅक आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, रसाळ पोत असलेले हे कटलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. संध्याकाळच्या चहासोबत, पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून किंवा मुलांच्या डब्यात देण्यासाठी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो.
चिकन कटलेटची खासियत म्हणजे ते आपल्या आवडीनुसार मसाले आणि हर्ब्स घालून वेगवेगळ्या चवीत तयार करता येते. ही रेसिपीघरी सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरून तयार करता येते आणि प्रत्येक वेळी रेस्टॉरंटसारखी चव देते.