Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेंड स्पेशल घरी काहीतरी चमचमीत होऊन जाऊद्यात; एकदा नक्की बनवून पहा मसालेदार Chicken Tikka Biryani

बिर्याणी म्हणजे खवय्यांसाठी ही एक पर्वणीच आहे! मात्र तुम्ही कधी चिकन टिक्का बिर्याणी खाल्ली आहे का? स्मोकी चिकन आणि त्यात सुगंधित भात यांचे उत्कृष्ट मिश्रण चवीला फार छान लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2025 | 10:25 AM
विकेंड स्पेशल घरी काहीतरी चमचमीत होऊन जाऊद्यात; एकदा नक्की बनवून पहा मसालेदार Chicken Tikka Biryani

विकेंड स्पेशल घरी काहीतरी चमचमीत होऊन जाऊद्यात; एकदा नक्की बनवून पहा मसालेदार Chicken Tikka Biryani

Follow Us
Close
Follow Us:

विकेंडचा दिवस जवळ येत आहे. अशात अनेकांच्या घरी नॉन व्हेजचा प्लॅन बनतो. नॉन व्हेज पदार्थांमध्येही बिर्याणी हा सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध डिश. अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यावर बिर्याणी हा पदार्थ आवर्जून ऑर्डर केला जातो अशात सर्वांच्या आवडीची ही बिर्याणी तुम्ही कधी घरी बनवून पाहिली आहे का? आज आम्ही तुमच्यासाठी बिर्याणीची एक हटके आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याचे नाव आहे चिकन टिक्का बिर्याणी.

व्हेज फलाफल कधी ट्राय केलं आहे का? हेल्दी आणि टेस्टी या पदार्थाची रेसिपी जाणून घ्या

नॉर्मल बिर्याणीपेक्षा याची चव आणि बनवण्याची पद्धत काहीशी वेगळी आहे. यात चिकनला मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून रोस्ट केले जाते आणि नंतर भातासोबत लेयर देऊन याला शिजवले जाते. याची चव फार छान लागते आणि विकेंड किंवा कोणत्या खास प्रसंगी बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बोनलेस चिकन – 500 ग्रॅम
  • दही – ½ कप
  • आले-लसूण पेस्ट – 2 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टेबलस्पून
  • हळद – 1 टीस्पून
  • गरम मसाला – 1 टीस्पून
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 1 टेबलस्पून
    बासमती तांदूळ – 2 कप (30 मिनिटे भिजवलेले)
  • कांदे – 2 मोठे (तळून कुरकुरीत)
  • टोमॅटो – 1 मध्यम (कापलेले)
  • दही – ½ कप
  • बिर्याणी मसाला – 2 टेबलस्पून
  • कोथिंबीर आणि पुदिना – बारीक चिरलेले
  • केशर दूध – 2 टेबलस्पून
  • तूप किंवा तेल – 3 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार

इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात? मग घरी बनवून पहा हॉटेल स्टाईल Paneer Chili Dry

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये चिकन, दही, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, लिंबाचा रस, मीठ, गरम मसाला आणि तेल घालून मिक्स करा.
  • हे मिश्रण किमान 1 तास मॅरिनेट करा (रात्रीसाठी ठेवले तर उत्तम).
  • मॅरिनेट केलेले चिकन तवा किंवा ओव्हनमध्ये शेकून घ्या, जोपर्यंत ते पूर्णपणे शिजून थोडं खरपूस होतं.
  • बासमती तांदूळ साजूक पाण्यात उकळून 90% शिजवून घ्या. पाणी गाळा आणि थंड होऊ द्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट, टोमॅटो, हळद, बिर्याणी मसाला आणि दही घालून मिक्स करा.
  • हे मिश्रण थोडं परतून त्यात चिकन टिक्का घालून 5 मिनिटे शिजवा.
  • एका मोठ्या भांड्यात आधी अर्धे तांदूळ, मग चिकन टिक्का मसाला, मग थोडे तळलेले कांदे, कोथिंबीर-पुदिना लावा.
  • पुन्हा वरून उरलेले तांदूळ घालून वरून केशर दूध आणि थोडं तूप शिंपडा.
  • भांडे झाकून मंद आचेवर 15-20 मिनिटे दम देऊन बिर्याणी तयार करा.
  • गरम गरम चिकन टिक्का बिर्याणी रायता आणि सलाडसह सर्व्ह करा.
  • अशा प्रकारे तयार होते मसालेदार आणि सुगंधित चिकन टिक्का बिर्याणी

Web Title: Weekend special tasty chicken tikka biryani recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • biryani
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने
1

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ
2

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
3

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी
4

लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.