Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री झोपेमध्ये तोंडातून लाळ कशामुळे गळते? ॲसिडिटी की आतड्यांसंबंधित आजार, ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

झोपल्यानंतर वारंवार तोंडातून लाळ गळत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत. कारण मेंदू किंवा आतड्यांसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर तोंडातून लाळ बाहेर पडते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2026 | 08:21 AM
रात्री झोपेमध्ये तोंडातून लाळ कशामुळे गळते? ॲसिडिटी की आतड्यांसंबंधित आजार, 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

रात्री झोपेमध्ये तोंडातून लाळ कशामुळे गळते? ॲसिडिटी की आतड्यांसंबंधित आजार, 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

तोंडातून लाळ गळण्याची महत्वपूर्ण कारणे?
रात्री झोपेमध्ये तोंडातून लाळ कशामुळे गळते?
तोंडातून लाळ गळू नये म्हणून काय करावे?

झोपल्यानंतर तोंडातून लाळ गळणे अतिशय सामान्य समस्या आहे. जागे असताना तोंडात जमा होणारी लाळ सतत गिळली जाते. पण झोपल्यानंतर चेहऱ्याचे स्नायू पूर्णपणे शिथिल होतात, ज्यामुळे लाळ तोंडात तशीच साचून राहते. तोंडात साचून राहिलेली लाळ काही वेळानंतर बाहेर पडू लागते. ही समस्या कधीतरी उद्भवत असेल तर झोपेच्या स्थितीमुळे असू शकते, पण वारंवार तोंडातून लाळ गळत असेल तर यामध्ये शारीरिक दोष असू शकतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. तोंडातून लाळ गळण्याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे सायनस इन्फेक्शन, सर्दी, किंवा नाकाचे हाड वाढलेले असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांच्या तोंडातून लाळ गळते.(फोटो सौजन्य – istock)

चिकनगुनिया झाल्यानंतर मृत्यू होतो? गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे, इनफेक्शन दूर करण्यासाठी उपाय

स्लीप ॲप्निया हा एक गंभीर आजार आहे. ज्यामुळे झोपेत श्वास वारंवार थांबतो आणि तोंडातून लाळ गळण्याचे प्रमाण खूप जास्त वाढते. पोटातील ॲसिड अन्नाच्या नळीतून वर येण्यास सुरुवात होते, तेव्हा लाळ ग्रंथींना उत्तेजित करते. हे ॲसिड न्यूट्रलाईज करण्यासाठी जास्त लाळ तयार करावी लागते. याशिवाय पोटात वाढलेल्या जंतांमुळे सुद्धा तोंडातून लाळ बाहेर पडते. लाळ गळण्याचे प्रमाण खूप जास्त वाढल्यास मेंदूच्या सिग्नलिंगमध्ये बिघाड होतो. अन्न किंवा लाळ गिळताना यूंच्या कमकुवतपणामुळे किंवा मेंदूच्या काही विकारांमुळे तोंडात लाळ झपाट्याने तयार होते आणि बाहेर पडू लागते. त्यामुळे वेळीच उपचार केल्यास शरीरसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवता येईल.

तोंडातून लाळ गळण्याची महत्वपूर्ण कारणे:

  • मानसिक आजारांवरील औषधे किंवा अँटी-सायकोटिक ड्रग्स
  • पोटावर झोपणे
  • कुशी होऊन जास्त वेळ झोपून राहणे
  • सर्दी, ॲलर्जी किंवा सायनस
  • पोटामध्ये आम्ल वाढणे किंवा अन्ननलिकेमध्ये वाढलेली जळजळ
  • पार्किन्सन रोग, सेरेब्रल पाल्सी किंवा पक्षाघात
  • मज्जासंस्थेसंबंधित आजार
Eating Schedule: सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

झोपल्यानंतर तोंडातून लाळ गळून नये म्हणून उपाय:

तोंडातून लाळ गळू नये म्हणून शक्यतो पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तोंडात तयार केलेली लाळ थेट शरीरात जाते. वारंवार सर्दी खोकला किंवा नाक बंद होत राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे किंवा वाफ घ्यावी. यामुळे सर्दी आणि बंद झालेल्या नाकापासून सुटका मिळेल. रात्री जेवण आणि झोप यामध्ये ३ तासांपेक्षा जास्त अंतर असावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास लाळ घट्ट होते. त्यामुळे दिवसभर खूप पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रात्री झोपेत तोंडातून लाळ का गळते?

    Ans: झोपेतील शरीराची स्थिती, नाक बंद असणे, ॲसिड रिफ्लक्स (GERD), तोंड उघडे ठेवून झोपणे, काही औषधांचे दुष्परिणाम किंवा काही न्यूरोलॉजिकल विकारांमुळे झोपेत लाळ गळू शकते.

  • Que: झोपेत लाळ गळणे हे ॲसिडिटीचे लक्षण असू शकते का?

    Ans: होय. काही व्यक्तींमध्ये ॲसिड रिफ्लक्स किंवा GERD मुळे तोंडात जास्त लाळ तयार होऊ शकते. मात्र याचे नेमके कारण डॉक्टरांच्या तपासणीनंतरच निश्चित करता येते.

  • Que: आतड्यांच्या किंवा पचनसंस्थेच्या आजारांमुळेही लाळ गळू शकते का?

    Ans: काही पचनसंस्थेशी संबंधित समस्या, विशेषतः ॲसिड रिफ्लक्स, यामध्ये लाळ वाढण्याची शक्यता असते. सतत त्रास होत असल्यास गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.

Web Title: What causes saliva during sleep at night whether it is due to acidity or intestinal disorders do not ignore these symptoms at all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • sleep problems

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
3

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
4

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.