Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उन्हाळ्यात पोट कशामुळे बिघडते? फूड पॉयजनिंगशिवाय असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

वाढत्या उष्णतेमुळे पोटात इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. पोटात वाढलेल्या इन्फेक्शनमुळे जुलाब, उलट्या आणि शरीरसंबंधित इतर समस्या उद्भवतात. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 11:06 AM
वाढत्या उन्हाळ्यात पोट कशामुळे बिघडते? फूड पॉयजनिंगशिवाय असू शकतात 'ही' गंभीर कारणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

वाढत्या उन्हाळ्यात पोट कशामुळे बिघडते? फूड पॉयजनिंगशिवाय असू शकतात 'ही' गंभीर कारणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन, सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.पण हल्लीच्या बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. हवमानात होणारे बदल, दूषित पाण्याचे सेवन, जंक फूड इत्यादींचे सेवन केल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना सर्दी खोकलासारख्या साथीच्या आजारांची लागण होत आहे. उष्णता वाढल्यामुळे अचानक पोटात क्रम्प्स येणे, पोटात वेदना तर काहीवेळा जुलाब होऊन संपूर्ण शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. पोटात वाढलेला वेदना केवळ खाण्यापिण्याच्या सवयींमुळेच नाहीतर इतर कारणांमुळे सुद्धा होतात. फूड पॉयसनिंग सोबतच उष्णता, अन्नपदार्थ साठवण्याची पद्धत, पाण्याची गुणवत्ता आणि वातावरण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)

‘शताब्दी’त दुर्मीळ मेंदूतील गाठीवर उपचार! ९ वर्षीय मुलीला नवजीवन; संसर्गातून उद्भवलेल्या आजारावर मात

वाढत्या उष्णतेमुळे शरीरात केवळ अस्वस्थता नाहीतर उलट्या, जुलाब इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. वाढलेल्या तापमानामुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. अन्न पदार्थ दिसायला जरी चांगले वाटत असले तरीसुद्धा पदार्थाना येणाऱ्या वासावर त्याची गुणवत्ता ओळखली जाते. अन्नपदार्थांमध्ये वाढलेले सूक्ष्मजंतू शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरतात. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात विकतचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याचं पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा ज्यूसमध्ये घातलेला बर्फ, अस्वच्छ फळे इत्यादी गोष्टींमुळे असलेले जंतू थेट शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे अन्नपदार्थांचे सेवन करताना शरीराची योग्य काळजी घ्यावी. कोणत्याही ठिकाणी प्यायले पाणी शरीरासाठी जीवघेणे ठरू शकते. डिहायड्रेशन, अनियमित जेवण आणि उच्च तापमान इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनसंस्थेवर लगेच दिसून येतो. पचनक्रिया बिघडल्यानंतर लट्या होणे, ताप, शौचातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.

High Blood Pressure वाढवण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ गंभीर चुका! तरुण वयातच घ्याव्या लागतील उच्च रक्तदाबाच्या गोळ्या

तापमानात वाढ झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होण्याची जास्त शक्यता असते. डिहायड्रेशन किंवा शरीरात वाढलेल्या अशक्तपणामुळे खूप जास्त थकल्यासारखे होते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित भरपूर आणि स्वच्छ पाणी प्यावे. यासोबतच ताज्या फळे आणि भाज्यांचे आहारात सेवन करावे. याशिवाय शरीरात उष्णता वाढल्यासारखे जाणवू लागल्यास भरपूर पाणी आणि थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे उन्हाळ्यात सुद्धा निरोगी राहाल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उन्हाळ्यात पोट बिघडण्याची मुख्य कारणे कोणती?

    Ans: उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता, दूषित अन्न-पाणी, बॅक्टेरियल इन्फेक्शन, जास्त तेलकट/तिखट अन्न आणि अनियमित आहार ही प्रमुख कारणे आहेत.

  • Que: फूड पॉयजनिंगशिवाय कोणती कारणे असू शकतात?

    Ans: डिहायड्रेशन, अ‍ॅसिडिटी, गॅस, व्हायरल इन्फेक्शन, उष्माघात (हीट स्ट्रोक) आणि पचनसंस्थेतील इतर विकार यामुळेही पोट बिघडू शकते.

  • Que: पोट बिघडल्याची लक्षणे कोणती?

    Ans: जुलाब, उलट्या, पोटदुखी, मळमळ, ताप, अशक्तपणा आणि भूक न लागणे ही सामान्य लक्षणे आहेत.

Web Title: What causes upset stomach in growing summer apart from food poisoning these serious causes can be dangerous to ignore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

Mental Health: तणाव कमी करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी, मानसिक आरोग्य सुधारेल
1

Mental Health: तणाव कमी करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी, मानसिक आरोग्य सुधारेल

पोषक घटकांनी समृद्ध असलेले सीताफळ शरीरासाठी ठरेल गुणकारी, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास होईल मदत
2

पोषक घटकांनी समृद्ध असलेले सीताफळ शरीरासाठी ठरेल गुणकारी, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास होईल मदत

पावसाळ्यात सुके मासे आवडीने खाता! मासे खाण्याआधी ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक, अन्यथा आरोग्यावर होतील परिणाम
3

पावसाळ्यात सुके मासे आवडीने खाता! मासे खाण्याआधी ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक, अन्यथा आरोग्यावर होतील परिणाम

जांभूळ मधाचे आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, पुण्यातील शास्त्रज्ञांचे संशोधन प्रकाशित
4

जांभूळ मधाचे आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, पुण्यातील शास्त्रज्ञांचे संशोधन प्रकाशित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.