खाद्यतेल कोणते व किती वापरावे? आरोग्यदायी स्वयंपाकासाठी करा योग्य तेलाची निवड, शरीर राहील निरोगी
सर्वसाधारण घरातून कानावर पडणारा संवाद, आमच्या आजोबांना हृदयविकाराचा त्रास आहे ना त्यामुळे आमच्या घरात सफोला तेलच वापरले जाते. तळण वगैरे तर आम्ही करतच नाही. अगदी कमीतकमी तेलात आमचा स्वयंपाक असतो. तेल अगदी वर्ज्य. पण अशा पद्धतीने तेल बंद करणं किंवा एकच एक तेल वापरणं आजी-आजोबांच्या प्रकृतीच्या दृष्टीने कितपत योग्य ? पाहूया कोणते तेल रोजच्या स्वयंपाकात वापरावे ?(फोटो सौजन्य – istock)
यामध्ये सगळ्या प्रकारच्या फॅटस्चे उत्तम मिश्रण आहे. नैसर्गिक ऍण्टीऑक्सिडेण्टस् असतात. जे फ्री रॅडिकल्स तयार होण्यापासून रोखतात. हृदयविकारापासूनही संरक्षण देतात. शेंगदाण्याच्या तेलात पॉली आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऑसिडस् कोलेस्टेरोल व सीडीएलची पातळी कमी करतात व एचडीएल कोलेस्टेरोल वाढवतात. करडईच्या तेलामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटस् जास्त प्रमाणात असतात. यात असलेले घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
तिळाच्या तेलात मोनो आणि पॉलो अनसॅच्युरेटेड फॅटी ऑसिडस् आढळून येतात. अनेक ठिकाणी तिळाच्या तेलाचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. शिवाय ऍण्टीऑक्सिडेण्टस् असतात. ते फ्री रॅडिकल्स तयार होण्यापासून रोखतात. हे तेल नसा आणि हाडांच्या रोगावर फायद्याचे असते. तिळाचे तेल वाल व संधिवातावर उपयुक्त असते. तिळाच्या तेलाच्या नियमित वापराने एचडीएल कोलेस्टेरोलची पातळी वाढते, हे तेल रिफाइंडपेक्षा जास्त उपयुक्त असते.
हे तेल आपल्या आहारात उपयुक्त ठरते. कारण यात ई जीवनसत्व असते. त्याचबरोबर मोनू ऍण्ड पॉली अनसॅच्युरेटेड फॅटस्चे योग्य प्रमाण असते. हे तेल रिफाइंड किंवा नॉनरिफाइंड प्रकारचे वापरले तरी चालते. राईस बॅन ऑइल हे तेलही आरोग्याला गुणकारी असते. फुफा व जीवनसत्त्वे असल्याने शरीराला फायदेशीर असते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते.
प्रत्येक तेलात विविध प्रमाणात फॅटी ऑसिडस् असल्यामुळे असे विशिष्ट आरोग्यदायी तेल कोणते हे सांगणे अशक्य आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात कोणत्याही तेलाचा वापर करण्याऐवजी वेगवेगळ्या तेलाचा वापर करावा. यामुळे पदार्थाची चव सुधारते आणि शरीराला फायदे होतात. पण दैनंदिन वापरात कोणत्याही चुकीच्या तेलाचा वापर करू नये.






