Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Menstrual Cycle: Sickle Cell Disease असलेल्या महिलांसाठी मासिक पाळीचा काळ अधिक आव्हानात्मक का ठरू शकतो?

मासिक पाळीत महिलांना अधिक त्रास होतो हे अमान्य करून चालणार नाही. मात्र त्यातही सिकल सेलचा आजार असलेल्या महिलांना त्रासाचे अधिक झटके येतात असं म्हटलं जातं. नक्की याची कारणं काय आहेत?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 23, 2026 | 11:34 AM
सिकल सेल आजारात मासिक पाळीचा अधिक त्रास का होतो (फोटो सौजन्य - iStock)

सिकल सेल आजारात मासिक पाळीचा अधिक त्रास का होतो (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • महिलांना मासिक पाळीत होणारा त्रास 
  • सिकल सेल आजार असताना मासिक पाळीत अधिक त्रास होतो 
  • काय आहे कारण, जाणून घ्या 
सिकल सेल रोग (Sickle Cell Disease – SCD) असलेल्या अनेक महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान वेदनादायी त्रासाचे झटके वाढल्याचे दिसून येते. मात्र, मासिक पाळी आणि सिकल सेल रोग यांच्यातील हा संबंध अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे महिलांमध्ये वेदनांचे झटके वाढण्यामागील एक महत्त्वाचे कारण लक्षात येत नाही.

बहुतेक महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. परंतु सिकल सेल रोग असलेल्या महिलांसाठी पाळी हा केवळ नियमित जैविक अनुभव नसून तो गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. सिकल सेल रोगातील सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक गुंतागुंतांपैकी एक म्हणजे ‘व्हॅसो-ऑक्लुझिव्ह क्रायसिस’ (Vaso-Occlusive Crisis – VOC) अर्थात रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होणारे तीव्र वेदनांचे झटके. मासिक पाळी हा अशा वेदनादायी झटक्यांना चालना देणारा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. डॉ. विजय रामनन, संचालक, क्लिनिकल हेमॅटोलॉजी, बोन मॅरो आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट, रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे. 

काय सांगतो अभ्यास 

विविध अभ्यासांनुसार, सिकल सेल रोग असलेल्या मासिक पाळी येणाऱ्या जवळपास एकतृतीयांश महिला आणि मुलींना पाळीदरम्यान वेदनांचे झटके येतात. तरीही मासिक पाळी आणि सिकल सेल वेदना यांच्यातील संबंधाबाबत पुरेशी जागरूकता नसल्याने अनेक महिलांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो आणि वारंवार रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते.

मासिक पाळी कायमच उशिरा येते? शरीरात होणारे ‘हे’ बदल असू शकतात आरोग्यासाठी धोक्याची घंटा, वेळीच व्हा सावध

नक्की कारणे कोणती?

या वाढलेल्या धोक्यामागे अनेक जैविक कारणे आहेत. मासिक पाळीदरम्यान शरीरात दाह (Inflammation) निर्माण होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. दुसरीकडे, सिकल सेल रोग असलेल्या व्यक्तींमध्ये वाकड्या आकाराच्या लाल रक्तपेशींमुळे शरीरात आधीच दीर्घकालीन दाहाची स्थिती असते. मासिक पाळीदरम्यान सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन (CRP) सारख्या दाह दर्शविणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढू शकते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याची आणि तीव्र वेदनांचे झटके येण्याची शक्यता वाढते.

पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळेही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. या काळात शरीरातून ‘प्रोस्टाग्लॅंडिन्स’ नावाचे हार्मोनसदृश घटक स्रवतात, जे गर्भाशयाचे आकुंचन सुरू करतात. यामुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन होऊन रक्तप्रवाह मंदावू शकतो. सिकल सेल रोगामध्ये आधीच रक्तप्रवाह कमी झालेला असतो. त्यामुळे लाल रक्तपेशी एकमेकांना चिकटून रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करण्याची शक्यता वाढते. परिणामी वेदना, दाह आणि रक्तप्रवाहातील अडथळे यांचे दुष्टचक्र तयार होते.

नक्की असे का घडते?

मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव ही आणखी एक गंभीर बाब आहे. सिकल सेल रोग असलेल्या अनेक महिलांमध्ये लाल रक्तपेशींचा नाश सामान्यपेक्षा अधिक वेगाने होत असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया) आधीच असते. त्यात मासिक पाळीमुळे होणारा रक्तस्राव अ‍ॅनिमिया अधिक वाढवू शकतो. त्यामुळे शरीरातील ऊतींपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याचे प्रमाण कमी होते आणि थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे तसेच दैनंदिन कामकाज करण्याची क्षमता घटणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये तातडीच्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता देखील भासू शकते.

मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय

काय आहेत उपाय?

सुदैवाने, या समस्येवर प्रभावी व्यवस्थापनाचे पर्याय उपलब्ध आहेत. हार्मोनल उपचार, विशेषतः ‘प्रोजेस्टिन-ओन्ली’ (Progestin-only) उपचार पद्धती, मासिक पाळीतील रक्तस्राव कमी करण्यास मदत करू शकतात आणि वेदनांचे झटके कमी होण्यासही हातभार लावू शकतात. इंजेक्शन, इम्प्लांट्स किंवा गर्भाशयातील साधने (IUDs) यांसारखे पर्याय काही महिलांसाठी उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय पुरेसे पाणी पिणे, योग्य वेदनानियंत्रण आणि नियमित वैद्यकीय सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.

मासिक पाळी आणि सिकल सेल रोग यांच्यातील संबंधाबाबत अधिक जनजागृती होण्याची गरज आहे. मासिक पाळी ही व्हॅसो-ऑक्लुझिव्ह क्रायसिसला कारणीभूत ठरू शकते, याची जाणीव महिलांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि आरोग्यसेवा तज्ज्ञांना असल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोपे होते. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते आणि सिकल सेल रोग असलेल्या महिलांचे जीवनमान अधिक चांगले होऊ शकते.

Web Title: Why can the period of menstruation be more challenging for women with sickle cell disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Menstrual health
  • period
  • women health

संबंधित बातम्या

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर
1

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…
2

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Women Health: मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो? इनफेक्शन वाढल्यास दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
4

Women Health: मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो? इनफेक्शन वाढल्यास दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.