शरीरात सतत थकवा जाणवतो? आयर्नची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसू लागतात 'ही' महाभयंकर लक्षणे
रक्ताची कमतरता कशामुळे निर्माण होते?
हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
रक्त कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
शरीरात रक्ताची पातळी योग्य प्रमाणात असणे फार महत्वाचे आहे. संपूर्ण शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत चालू राहिल्यास आरोग्यासंबंधित कोणत्याही गंभीर समस्या उद्भवत नाहीत. पण रक्ताची पातळी कमी झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. वारंवार थकवा, अशक्तपणा, काम करण्याची इच्छा न होणे, त्वचा सुकणे, केस गळणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. बऱ्याचदा हिमोग्लोबिनची पातळी तपासण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्या केल्यानंतर शरीरात हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात आहे की नाही हे समजते. पण बऱ्याचदा हिमोग्लोबिनची योग्य प्रमाणात असून सुद्धा रक्ताची पातळी कमी असते. डॉक्टरांच्या मते, आयर्नचे काम केवळ रक्त तयार करण्यासाठी नाहीतर शरीरातील प्रत्येक अवयवांना ऑक्सिजन पोहचवणे. आयर्नची कमतरता निर्माण झाल्यानंतर हृदय आणि मेंदू या दोन्ही महत्वपूर्ण अवयवांवर परिणाम दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
हिमोग्लोबिन नॉर्मल असून सुद्धा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे म्हणजे आयर्न डेफिशिअन्सीचा शेवटचा टप्पा आहे. ही पातळी पूर्णपणे कमी झाल्यानंतर शरीरात अनेक लहान मोठी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने लक्षणे वाढू लागल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला आयर्न डेफिशिअन्सी निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवणे, झोप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा फ्रेश न वाटणे, थोडं चालल्यावर, जिने चढताना छातीत धडधड जाणवणे, व्यायाम करताना ऊर्जा नसणे, स्नायूंमध्ये वाढलेली कमजोरी इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. पण या लक्षणांकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. ही लक्षणे दिसू लागल्यानतंर कालांतराने शरीरात कमी ऑक्सिजन पोहचते.
रक्ताची पातळी कमी झाल्यानंतर थेट मेंदूवर परिणाम होतो. वागणुकीत अनेक बदल दिसू लागतात. मेंदूला पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे विचार करण्याची प्रक्रिया मंदावते. लक्ष केंद्रित करताना खूप जास्त अडथळे निर्माण होतात. याशिवाय गोड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा वाढते, यामुळे शरीराला झपाट्याने ऊर्जा मिळते. याशिवाय महिलांना मासिक पाळी आल्यानंतर सुद्धा खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. हे आयर्न कमतरतेचे महत्वपूर्ण लक्षण आहे.
तुमचे पायही सतत सुजतात का? मग घरच्या घरी या 5 सवयींचे पालन करा, काही दिवसांतच मिळेल आराम
ओठांच्या कोपऱ्यात भेगा पडणे, जिभेवर सतत जळजळ होणे, घरातील साधी काम करताना खूप जास्त थकवा जाणवतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे हृदय आणि मेंदू संबंधित आजारांची लागण होणार नाही. गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी वेळीच उपचार करावेत.
Ans: मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे, पेप्टिक अल्सर, किंवा मूळव्याध यामुळे होणारा रक्तस्त्राव
Ans: पालक, मेथी, बीट, सोयाबीन, डाळी, हरभरा, राजमा, मटार, सुकामेवा
Ans: जलद किंवा अनियमित हृदयाचे ठोके. लहान मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक वाढीस विलंब.






