Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Girls Fear Lizards: मोठमोठ्या संकटांना न घाबरणाऱ्या मुली पाल पाहताच का किंचाळतात? यामागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण

Why Girls Feared Lizards: पाल पाहताच मुली का घाबरतात किंवा जोरात का किंचाळतात, यामागचे कारण काय, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 27, 2026 | 06:20 PM
Girls Fear Lizards: मोठमोठ्या संकटांना न घाबरणाऱ्या मुली पाल पाहताच का किंचाळतात? यामागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण
Follow Us
Follow Us:
  • मुली पाल पाहताच का किंचाळतात?
  • मुली अन् पालीचे हे अजब ‘कनेक्शन’
  • यामागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण
घरात भिंतीवर अचानक पाल दिसली की अनेकजण घाबरतात. काहीजण शांतपणे तिला हाकलून लावतात, तर अनेक मुली भीतीने जोरजोरात किंचाळतात किंवा तेथून पळून जातात. ही भीती अनेकदा विनोदाचा भाग ठरते. परंतु, मानसशास्त्र आणि विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर त्यामागे काही कारणे आहेत. विशेष बाब म्हणजे, प्रत्येक मुलीला पालाची भीती वाटते असे नाही. पण काही व्यक्तींमध्ये ही भीती इतकी तीव्र असते की पाल दिसताच त्यांच्या शरीरात आणि मनात त्यांच्या स्वभावात बदल जाणवतो आणि ओरडायला सुरुवात करतात.

Health Alert: तुमची किडनी खराब झालीये? शरीरातील ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

मेंदू देतो धोक्याचा इशारा

पाल दिसताच मेंदूतील ‘अॅमिग्डला’ हा भाग अॅक्टिव्ह होतो. हा भाग कोणतीही अनोळखी किंवा संभाव्य धोकादायक गोष्ट ओळखून शरीराला सावध राहण्याचा संदेश देत असते. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे, किंचाळणे किंवा तिथून लगेच दूर जाण्याची प्रतिक्रिया दिसू लागते. प्रत्यक्षात पाल बहुतेक वेळा धोकादायक नसली असली तरी मेंदू तिच्याकडे सावधगिरीने पाहतो.

बालपणीचे अनुभवही ठरतात महत्त्वाचे

अनेकदा लहानपणी पाल अचानक अंगावर पडणे, पाल पाहून घरातील मोठ्यांना घाबरताना पाहणे किंवा सतत “पाल जवळ जाऊ नको” असे ऐकत वाढणे, याचा मनावर खोल परिणाम होत असतो. मोठे झाल्यानंतरही ती भीती कायम राहू शकते. त्यामुळे ही भीती जन्मजात नसून अनुभवातूनही तयार होऊ शकते.

काहींसाठी हा फक्त फोबिया असतो

वैद्यकीय भाषेत एखाद्या विशिष्ट गोष्टीची अतिप्रमाणात वाटणारी भीती ‘स्पेसिफिक फोबिया’ म्हणून ओळखली जाते. पाल किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची तीव्र भीती असणाऱ्या व्यक्तींमध्ये ही स्थिती आढळू शकते. अशा वेळी प्रत्यक्ष धोका नसतानाही भीती मात्र खरी वाटते.

पालाच्या हालचालीही वाढवतात अस्वस्थता

पाल अतिशय वेगाने धावते, अचानक दिशा बदलते आणि भिंतीवर किंवा वर सहज फिरते. पालीची अनपेक्षित हालचाली काही लोकांना अस्वस्थ करतात. त्यामुळे पाल दिसताच घाबरण्याची शक्यता अधिक वाढते.

भीतीवर मात करणे शक्य आहे

जर पालाची भीती इतकी वाढली की दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ लागला, तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. समुपदेशन, रिलॅक्सेशन तंत्र आणि योग्य थेरपीच्या मदतीने ही भीती हळूहळू कमी करता येते. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक मुलगी पालाला घाबरतेच असे नाही. ही भीती व्यक्तीनुसार बदलते आणि त्यामागे मानसिक तसेच वैयक्तिक अनुभव हे कारण असू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही.

Digital Stress: सतत मोबाईल वापरामुळे वाढतोय डिजिटल स्ट्रेस; तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

Web Title: Why girls fear lizards scientific reasons psychology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • animals
  • scientific approach
  • woman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.