Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांनो लक्षात ठेवा! पीरियड्सवेळीचूकुनही ‘या’ फळांचे सेवन करू नये, अन्यथा वाढू शकते मोठी समस्या

Women Menstrual Cycle : मासिक पाळीदरम्यान शरीरात हॉर्मोनल बदल होऊ लागतात. याकाळात काही फळांचे सेवन हे आवर्जून टाळायला हवे अन्यथा आरोग्याच्या समस्या दुपटीने वाढू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 08, 2026 | 08:15 PM
महिलांनो लक्षात ठेवा! पीरियड्सवेळीचूकुनही 'या' फळांचे सेवन करू नये, अन्यथा वाढू शकते मोठी समस्या

महिलांनो लक्षात ठेवा! पीरियड्सवेळीचूकुनही 'या' फळांचे सेवन करू नये, अन्यथा वाढू शकते मोठी समस्या

Follow Us
Close
Follow Us:
  • मासिक पाळीदरम्यान शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.
  • काही खाद्यपदार्थांमुळे पोटदुखी, अस्वस्थता किंवा पचनाच्या समस्या वाढू शकतात.
  • योग्य फळांची निवड केल्यास या काळात शरीराला आराम आणि ऊर्जा मिळू शकते.
मासिक पाळी महिलांसाठी सामान्य समस्या असली तरी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की याकाळात शरीरात अनेक बदल घडत असतात. याकाळात महिलांनी आपला त्रास कमी करण्यासाठी आहारात काही विशेष बदल करायला हवेत. याकाळात शरीरात होर्मोनल बदल होत असतात आणि या बदलांचा त्यांच्या मनःस्थितीवर परिणाम होत असतो. इतकेच नाही तर याचा आपल्या पचनक्रियेवरही परिणाम होतो. काही फळे आपल्या शरीराला आराम देऊ शकतात तर काही शरीरात अस्वस्थता वाढवू शकतात. हेल्थफॅब या आरोग्यविषयक वेबसाइटने महिलांनी मासिक पाळी दरम्यान कोणत्या फळांचे सेवन प्रकर्षाने टाळायला हवेत ते स्पष्ट केले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सायलंट किलर ठरत आहे पॅनक्रियाज कॅन्सर! कावीळ आणि पचनक्रियेतील बदल देतात जीवघेणी चाहूल, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

अननस

अनेकांच्या आवडीचं हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी मासिक पाळीच्या काळात मात्र याचे फार सेवन करु नये. अननसात असलेले एन्झाइम्स शरीरातील रक्तप्रवाह वाढवू शकतात, ज्यामुळे शरीरातून जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.

कलिंगड

कलिंगड हे उन्हाळ्यात हमखास खाल्ले जाणारे फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत याचे सेवन खूप फायद्याचे मानले जाते पण लक्षात ठेवा मासिक पाळीदरम्यान याचे सेवन अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. त्यातील पाण्याचे जास्त प्रमाण पोट फुगणे, शरीरात पाणी साचून राहणे अशा समस्यांना जन्म देते. मासिक पाळीच्या काळात जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास सतावत असेल तर कलिंगडाच्या सेवनाने हा त्रास आणखी वाढू शकतो.

लिंबूवर्गीय फळे

याकाळात तुम्ही लिंबू, संत्री आणि द्राक्ष अशी लिंबूवर्गीय फळे फार खाऊ नयेत. यामध्ये आम्लाचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे याचा आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. अनेक महिलांना मासिक पाळीच्या काळात आधीच आम्लपित्त किंवा मळमळीचा त्रास होतो अशात या फळांचे सेवन हा त्रास दुपटीने वाढवू शकतात.

कच्ची केळी

याचबरोबर याकाळात कच्ची फळे जसे की, केळीचे सेवन अस्वस्थता वाढवू शकते. केळ्यांमध्ये असलेले रेझिस्टंट स्टार्च पचायला जड असते ज्यामुळे पचनाच्या समस्या वाढू लागतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो. जर तुमचे शरीर आधीच संवेदनशील असेल तर अशा काळात या फळांचे सेवन चुकुनही करु नका.

उन्हाळामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा होईल चमकदार! त्वचेवर लावा Coconut Face Pack, टॅनिंग होईल गायब

कोणत्या फळांचे सेवन करावे?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग अशी कोणती फळे उरली ज्यांचे पाळीदरम्यान सेवन केले जाऊ शकते. तुमच्या याच शंकेचे निरसन करण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही तुमच्या आहारात पिकलेली केळी, सफरचंद, बेरी आणि किवी सारख्या फळांचा समावेश करु शकता. ही फळे पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Women should not eat these fruits during periods lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • menstruation health

संबंधित बातम्या

Obesity: लठ्ठपणाचा वाढता आजार, वजन कमी करणे दिवसेंदिवस का होतेय कठीण? तज्ज्ञांचा इशारा
1

Obesity: लठ्ठपणाचा वाढता आजार, वजन कमी करणे दिवसेंदिवस का होतेय कठीण? तज्ज्ञांचा इशारा

सायलंट किलर ठरत आहे पॅनक्रियाज कॅन्सर! कावीळ आणि पचनक्रियेतील बदल देतात जीवघेणी चाहूल, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका
2

सायलंट किलर ठरत आहे पॅनक्रियाज कॅन्सर! कावीळ आणि पचनक्रियेतील बदल देतात जीवघेणी चाहूल, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

दररोजच्या छोट्या बदलांनी टाळा मोठे आजार: मधुमेह, लठ्ठपणा आणि बीपीवर प्रभावी उपाय
3

दररोजच्या छोट्या बदलांनी टाळा मोठे आजार: मधुमेह, लठ्ठपणा आणि बीपीवर प्रभावी उपाय

Luxury Bag : डायनासोरच्या चामड्यापासून बनवलेल्या लक्झरी बॅगचा होत आहे लिलाव, बोलीची सुरुवातीची किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल
4

Luxury Bag : डायनासोरच्या चामड्यापासून बनवलेल्या लक्झरी बॅगचा होत आहे लिलाव, बोलीची सुरुवातीची किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.