दूध दान कसे केले जाते (फोटो सौजन्य - iStock)
अनेकदा नवजात आईला पहिल्या दिवसापासूनच दूध येत नाही. मग अशावेळी पावडरचे दूध देण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा आई खूप प्रयत्न करते पण बाळाला तिला दूध पाजता येत नाही आणि कधी कधी तर नवजात आईचे दूध ३-४ दिवसात आटूनही जाते. यासाठी अनेकदा शतावरी, आळशी अशा पदार्थांचे सेवनही केले जाते. पण अनेकदा काही नवजात आईंना दूध येतच नाही. मग बाळाला सहा महिने कसे दूध देणार हा प्रश्न पडतो.
दरम्यान काही संस्था अशा आहेत, ज्या आईचे दूध दान करतात. आता म्हणजे नक्की काय आणि अशा कोणत्या संस्था आहेत जे असे कार्य करतात हे आपण जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
भारतात आईचे दूध कुठे दान केले जाते?
सायन हॉस्पिटल (मुंबई)
१९८९ मध्ये स्थापन झालेली ही भारतातील पहिली मानवी दूध बँक आहे. तिला “सुधा साळवी मानवी दूध बँक” असेही म्हणतात. तुम्ही येथून आईचे दूध दान मिळवू शकता आणि आपल्या बाळाला देऊ शकता.
Breast Feeding Week: स्तनपानास प्रोत्साहन देणे ही काळाची गरज, काय म्हणतात डॉक्टर?
फोर्टिस ला फेमे हॉस्पिटल (दिल्ली)
येथे दूध संकलन आणि सुरक्षित साठवणुकीची प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केली जाते. ते नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) दाखल असलेल्या मुलांना हे दूध पुरवते. अनेकदा मुलांंसाठी इथून दुधाचा पुरवठा केला जातो.
अमराह मिल्क बँक (हैदराबाद)
ही एक आघाडीची खाजगी मिल्क बँक आहे जी देणगी आणि वितरण दोन्ही करते, विशेषतः अकाली जन्मलेल्या किंवा आजारी बाळांसाठी.
रोटरी क्लब मिल्क बँक
भारतातील अनेक रोटरी क्लब विशेषतः ग्रामीण आणि गरजू भागात मानवी दूध बँकांना मदत करत आहेत.
World Breastfeeding Week: नवजात बालकांसाठी स्तनपान का महत्त्वाचे, आई-बाळाची पहिली भेट
दूध कोण दान करू शकते?
दूधदानाचे फायदे
स्तन दूध दान हे एक पाऊल आहे जे लहान मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकते. ते केवळ औषधाचाच एक भाग नाही तर भावनिक बंधन देखील आहे. आईच्या प्रेमाचा विस्तार जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूची कोणतीही आई दूध दान करू शकत असाल तर ही माहिती शेअर करा.