स्तनपान सप्ताह, का आहे महत्त्वाचे (फोटो सौजन्य - iStock)
दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात स्तनपानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. एखाद्या अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपानासाठी बाळाच्या मातेकडे तेवढ्या प्रमाणात दुधाची निर्मिती होत नाही. त्यामुळे या शिशुंना पुरेसं स्तनपान होत नसल्याने शिशू कमजोर होतो. त्यावेळी त्यावेळी ह्युमन मिल्क बँक तसेच शीतपेटीत साठविण्यात आलेल्या दुधाचा वापर केला जातो. पारुल मुदित मिश्रा, स्तनपान तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
स्तनपान किती महत्त्वाचे
स्तनपान ही एक नैसर्गिक कृती आहे. स्तनपान करण्याची, दूध साठवण्याची किंवा सार्वजनिक ठिकाणी दूध उपलब्ध करुन देण्याची क्षमता ही संसाधनांच्या उपलब्धतेद्वारे दिवसेंदिवस वाढत आहे. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आईसाठी दुध साठविण्यासाठी उत्तम फ्रीजर, खाजगी पंपिंग स्पेस आणि चांगल्या दर्जाचे ब्रेस्ट पंप उपलब्ध करुन देत स्तनपानास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
इतरांसाठी, जसे की बँक मॅनेजर असलेल्या मातेला ब्रेस्ट पंप करण्यासाठी पुरेसा वेळ किंवा जागा मिळत नाही, त्यांच्यासाठी स्तनपान टिकवून ठेवण्यासाठी विशेष पाऊल उचलणे गरजेचे आहे. स्तनपानाकरिता मातेला आधार किंवा कामाच्या ठिकाणी राहण्याची सोय नसलेल्या महिलांना अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो, त्यांना अनेकदा लवकर स्तनपान सोडावे लागते.
World Breastfeeding Week: नवजात बालकांसाठी स्तनपान का महत्त्वाचे, आई-बाळाची पहिली भेट
काय आहेत आव्हानं?
सामाजिक अपेक्षा देखील स्तनपानात अनेक गुंतागुंत निर्माण करतात. महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणे भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक वाटते. अशावेळी अनेक माता दुधाच्या बाटल्यांचा पर्याय निवडतात कारण घराबाहेर स्तनपान करताना जसे की मॉलमध्ये, प्रवास करताना त्यांना स्तनपानाकरिता सुरक्षित जागा न मिळण्याची त्यांना भीती वाटते. त्यापैकी काही माता स्तनपान करतेवेळी बाळाला झाकण्यासाठी स्कार्फ किंवा ओढणीचा वापर करतात. स्तनपानाकरिता सुरक्षित जागेचा अभाव हे स्तनपान करण्याच्या प्रमुख अडथळ्यांपैकी एक आहे.
काय आहे काळाची गरज?
आहार कक्ष उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज आहे. स्तनपान देणाऱ्या मातांना पाठिंबा देणाऱ्या कायदेशीर तरतुदी असूनही, देशभरात त्याची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. मॉल, कामाच्या ठिकाणी आणि विद्यापीठांमध्ये आहार कक्ष दुर्मिळ किंवा अविकसित आहेत. निवडक ठिकाणी काहीशी सुधारणा दिसून येत आहेत जसे की काही धार्मिक स्थळे आणि महामार्गावरील विश्रांती थांब्यांमध्ये आता आहार कक्ष उपलब्ध आहेत.
आज जन्माला आलेली मुलं ही उद्याचे भविष्य आहे आणि त्यांच्या आतड्यांचे आरोग्य हे आयुष्यभराच्या कल्याणाचा पाया रचते. नवजात बाळाचे आतडे अतिशय नाजूक असते आणि आईचे दूध त्याच्या संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावते. वाढत्या संशोधनातून असे दिसून आले आहे की अनेक जुनाट आजार सर्वात आधी आतड्यात सुरू होतात, त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचे संरक्षण आणि पोषण करणे अधिक गरजेचे आहे. जर आपण आपल्या मुलांच्या आरोग्याची आणि आपल्या देशाच्या भविष्याबाबत खरोखरच काही करु इच्छितो तर आपण त्यांना योग्य आहाराची संधी दिला उपलब्ध करुन दिली पाहिजे.
कसे आहेत पर्याय
पंपिंग आणि दुधाच्या साठवणुकीत वाढ झाल्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्या आणि साठवणुकीच्या पिशव्यांचा वापर वाढला आहे, ज्यामुळे पर्यावरणीय कचरादेखील वाढतो. दुसरीकडे, फॉर्म्युला फीडिंग जो अनेकदा सोयीस्कर पर्याय म्हणून निवडला जातो त्याचे औद्योगिक उत्पादन आणि पॅकेजिंगपासून वाहतुकीच्या कार्बन फूटप्रिंटपर्यंत मोठा खर्च येतो.
ह्युमन मिल्क बँक हा पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत पर्याय ठरतोय. यामुळे गरजू बाळांना, विशेषतः अकाली जन्मलेल्या बाळांना आईचे दूध पुरविता येते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, केवळ १ ते २ मिली दूध जीवनरक्षक ठरू शकते.
स्तनपानामुळे होतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी, तज्ज्ञांचा खुलासा
आईच्या दुधाचा फायदा
आज अनेक माता दुसऱ्या निरोगी, इच्छुक आईचे दूध स्वीकारण्यापेक्षा आपल्या बाळाला गाईचे दूध देणे अधिक अधिक सोयीस्कर असल्याचे मानतात. आईचे दूध बाळाच्या आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अनेक जुनाट आजार आतड्याच्या मायक्रोबायोटाशी जोडलेले आहेत. आणि म्हणूनच स्तनपानाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. दुसरीकडे, जागतिक अहवालांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, फॉर्म्युलामध्ये जास्त साखर किंवा दूषित पदार्थ देखील असू शकतात. तरीही, हे वैद्यकीयदृष्ट्या हा एक शेवटचा पर्याय असावा आणि पायाभूत सुविधा किंवा पाठिंब्याच्या अभावामुळे तो चुकीचा ठरविता येणार नाही.
मातेला जेव्हा तिला हवे तेव्हा ती स्तनपान थांबवण्याचा निर्णय घेऊ शकते व त्याचा आपण आदर करणे गरजेचे आहे. ती काही ठराविक महिने किंवा वर्षे स्तनपान करण्याचा निर्णय घेते किंवा लवकर दूध सोडण्याचा निर्णय घेते यासाठी तिला आधार मिळायला हवा.