Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष्यात कधीच होणार नाही मधुमेह! रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2026 | 05:30 AM
आयुष्यात कधीच होणार नाही मधुमेह! रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' बदल

आयुष्यात कधीच होणार नाही मधुमेह! रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' बदल

Follow Us
Follow Us:

मधुमेहाची लक्षणे?
मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे?
मधुमेहाची रुग्ण संख्या वाढण्यामागील कारण?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हा एक गंभीर आणि कधीच बरा न होणारा आजार आहे. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने लक्षणे तीव्र होतात आणि शरीर आतून पोखरून काढतात. रक्तात साखर वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय शरीरावर जखमा होण्याची जास्त शक्यता असते. हातावर किंवा पायावर आलेली लहानशी फोडी जखम तयार करते, ज्याच्या परिणामामुळे हात किंवा संबंधित अवयव कापून टाकावा लागतो. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

Health Care Tips: स्मृतिभ्रंशावर नियमित योग अधिक प्रभावी! १२ आठवड्यांपर्यंत दररोज ६० मिनिटे योगसत्रामुळे बदल

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, वारंवार जंक फूड किंवा गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढण्यासोबतच शरीराला इतर आजारांची सुद्धा लागण होते. वारंवार तहान लागणे, अंगाला सतत खाज येणे, जखमा लवकर बऱ्या न होणे तर काहीवेळा थकवा अशक्तपणा वाढून सतत चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करणे आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बदलांमुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल.

भरपूर पाणी पिणे:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये भरपूर पाणी पिणे फार आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. सतत पाणी प्यायल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय रक्तातील हानिकारक विषारी घटक बाहेर पडून जातात. सामान्य व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी १ ते २ लिटर पाण्याचे सेवन करावे.

रक्तातील साखरेची पातळी तपासणे:

रक्तात वाढलेली साखर तीन महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा तपासणे फार आवश्यक आहे. फ्रीस्टाइल लिब्रे यांसारखी उपकरणे रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण अचूक सांगतात. रक्तातील साखरेची पातळी दररोज 24 तासांपैकी 17 तास आयडियल लेव्हलवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीर कायमच निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली करणे फार आवश्यक आहे.

आधुनिक उपचार पद्धतीने शरीराला मिळेल नवीन ताकद! अवयवांचे आरोग्य आणि पुनर्प्राप्तीसाठी सेल बेस थेरेपी का आहे फायदेशीर

हेल्दी पदार्थांचे सेवन:

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात मेथी दाणे, जांभूळ, फळे आणि इतर पालेभाज्यांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय आहारात आंबट फळे, आवळा, लिंबूवर्गीय फळांचे सेवन करावे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित एक ग्लासभर पाण्यात मेथी दाणे भिजत घालवून त्याचे पाणी उपाशी पोटी प्यावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जीवनशैलीत बदल केल्याने मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो का?

    Ans: होय, संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य वजन राखणे आणि निरोगी सवयी यामुळे मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • Que: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: कमी साखरयुक्त आहार घेणे, फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे, नियमित शारीरिक हालचाल करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे फायदेशीर ठरू शकते.

  • Que: मधुमेह टाळण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घ्यावेत?

    Ans: हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी, कडधान्ये, फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा संतुलित प्रमाणात समावेश करावा.

Web Title: You will never develop diabetes make these lifestyle changes to keep your blood sugar levels under control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • diabetes
  • home remedies for Diabetes
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

Stress and Diabetes Connection: तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका; शरीरावर कसा होतो परिणाम?
1

Stress and Diabetes Connection: तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका; शरीरावर कसा होतो परिणाम?

मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का? वाढलेला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा
2

मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का? वाढलेला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.