Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई पोलिसांवर कामाचा वाढता ताण; 127 पोलिसांचा वर्षभरात झाला ‘ऑनड्युटी’ मृत्यू

१४ तास सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागतो. यामुळे त्यांची तब्येत सतत खालावत जाते. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी सुट्टयाही मिळत नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 06, 2025 | 01:19 PM
मुंबई पोलिसांवर कामाचा वाढता ताण; 127 पोलिसांचा वर्षभरात झाला ऑनड्युटी मृत्यू

मुंबई पोलिसांवर कामाचा वाढता ताण; 127 पोलिसांचा वर्षभरात झाला ऑनड्युटी मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई / तारीक खान : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस दलात असलेले अपुरे संख्याबळ मुंबई पोलिसांसाठी घातक ठरत आहे. कामाचा वाढता ताण, ड्युटीचे अतिरिक्त तास, अनियमित जेवण आणि अपुरी झोप ही कारणे पोलिसांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत. याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कुरार पोलिस ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल सुभाष कांगणे (३७) यांची आत्महत्या आणि बुधवारी हैदराबाद विमानतळावर हृदयविकाराच्या झटक्याने काळा चौकी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार महेश साळुंखे यांचा मृत्यू ही ताजी प्रकरणे आहेत.

मुंबईत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा संपूर्ण जगावर परिणाम होतो. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. राज्याच्या राजकीय घडामोडींचे केंद्र असलेले मुंबई हे अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे निवासस्थानही आहे. राजकीय सभा, नेत्यांच्या बैठका इत्यादींसाठी मोठ्या संख्येने पोलिस दलाची उपस्थिती देखील आवश्यक असते. येथे सर्व धर्मांचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असल्याने या काळात पोलिसांच्या सुट्टया रद्द केल्या जातात.

आठ तास काम करण्याचा आदेश असला तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पोलिसांना ड्युटीवर येण्याची वेळ असते पण त्यांना निघून जाण्याची निश्चित वेळ नसते. शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत मुंबई पोलिसांची संख्या खूपच कमी आहे.

३ वर्षांत ३८१ पोलिसांचा कर्तव्यावर मृत्यू

पोलिसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२२ ते जानेवारी २०२५ दरम्यान, मुंबई पोलिस दलातील ३८१ पोलिसांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे. ३८१ पैकी ३३४ जणांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला, ज्यात ३०० कर्मचारी आणि ३४ अधिकऱ्यांचा समावेश होता. २४ जणांचा अचानक मृत्यू झाला आहे, ज्यात २१ कर्मचारी आणि तीन अधिकारी यांचा समावेश आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार याच दरम्यान २२ पोलिस कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याने कर्तव्यावर असताना आत्महत्या केली आहे.

मृत्यूचे कारण

■ अनियमित दिनचर्या असणे
■ खाण्यापिण्याची निश्चित वेळ नाही.
■ अनियमित कामकाज
■ नियमित वैद्यकीय
तपासणीकडे लक्ष न देणे
■ पोलिस स्टेशन किंवा इतर ठिकाणी काम करण्याची गैरसोय.
■ आजारांकडे दुर्लक्ष करण्याची
सवय असणे

जास्त कामाचे तास हा चिंतेचा विषय

१४ तास सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागतो. यामुळे त्यांची तब्येत सतत खालावत जाते. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी सुट्टयाही मिळत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस विभागात मनुष्यबळाची कमतरता ही देखील चिंतेची बाब आहे. विभागात अधिक भरती करावी आणि प्रत्येकाची ड्युटी १२ तासांऐवजी ८ तासांची करावी.

– प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक

Web Title: 127 policemen died on duty in a year nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • Home Ministry
  • Maharashtra Police
  • Police Department

संबंधित बातम्या

Crime News : चोरट्यांनी पळवल्या मोबाईल टॉवरच्या २३ बॅटऱ्या; गंगाखेडमधील चोरीच्या घटनेत वाढ
1

Crime News : चोरट्यांनी पळवल्या मोबाईल टॉवरच्या २३ बॅटऱ्या; गंगाखेडमधील चोरीच्या घटनेत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.