
vietnam boat accident indian tourists dead phu quoc island capsized helpline embassy
Vietnam Indian tourists boat capsize 2026 : व्हिएतनाममधून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. व्हिएतनाममधील (Boat Accident) प्रसिद्ध आणि सुंदर फु क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक वेगवान स्पीडबोट समुद्रात उलटली आहे. या भीषण अपघातामध्ये १५ भारतीय पर्यटकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर २१ जणांना स्थानिक बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. या घटनेमुळे पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने या घटनेला दुजोरा दिला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे.
भारतीय दूतावासाने सोशल मीडिया मंच ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक अधिकृत पोस्ट शेअर करून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दूतावासाने म्हटले आहे की, “ही अत्यंत वेदनादायक आणि दुःखद घटना आहे. फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची माहिती मिळताच आम्ही स्थानिक प्रशासनाच्या आणि सुरक्षा दलांच्या सतत संपर्कात आहोत. दुर्घटनेचा नेमका तपशील आणि कारणांचा शोध घेतला जात आहे.” पर्यटकांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी दूतावासाने तातडीने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार
फु क्वोक विशेष आर्थिक क्षेत्रातील (Phu Quoc Special Economic Zone) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना दुपारी साधारण १ वाजण्याच्या सुमारास घडली. ‘ओशन पियर आयलंड कंपनी’ची (Ocean Pier Island Company) एक स्पीडबोट पर्यटकांना घेऊन फु क्वोक विमानतळापासून साधारण २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या होआन मे मार्गावरून आन थोई (An Thoi) बंदराच्या दिशेने निघाली होती. सर्व पर्यटक समुद्राच्या सफारीचा आनंद घेत होते.
🚨Breaking news: A boat carrying 32 Indian tourists has capsized near the Phu Quoc Island in Vietnam. 15 Indian tourists have likely died. Many injured Rescue efforts are on pic.twitter.com/qJZpvSNok1 — OpIndia.com (@OpIndia_com) July 11, 2026
credit – social media and Twitter
परंतु, प्रवास सुरू असतानाच होआन येथील रूट न्गोईपासून सुमारे ४९९ मीटर अंतरावर ही स्पीडबोट अचानक अनियंत्रित झाली आणि समुद्रात उलटली. बोट उलटताच त्यातील सर्व ३६ प्रवासी थेट खोल समुद्रात फेकले गेले. अचानक झालेल्या या अपघातामुळे समुद्रात एकच चीत्कर आणि गोंधळ निर्माण झाला. लाइफ जॅकेट आणि सुरक्षा साधनांनंतरही लाटांचा वेग प्रचंड असल्याने अनेक पर्यटकांना स्वतःला सांभाळता आले नाही.
#BREAKING: Indian Embassy in Vietnam shares list of 32 passengers who were on board the boat which capsized this morning in Vietnam. As per local authorities 15 people have lost their life. Three remain critical. pic.twitter.com/oatmhH7j4s — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 11, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-AfghanTies: ‘भारत आणि आमचा DNA एकच…’, अफगाण मंत्री ओमारींचे भावूक उद्गार; काबूल दिल्लीच्या ठाम पाठीशी
ही दुर्घटना घडली तेव्हा सुदैवाने जवळून जाणाऱ्या इतर काही पर्यटक बोटींच्या चालकांनी हा प्रकार पाहिला. ते तात्काळ मदतीसाठी घटनास्थळाच्या दिशेने धावले. बचावकार्यात सहभागी झालेल्या एका स्थानिक बोटीच्या मालकाने सांगितले की, “माझी बोट अवघ्या ५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचली होती. पण बोट पूर्णपणे पालथी झाली होती आणि काही लोक त्या बोटीच्या आत अडकले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढणे अत्यंत कठीण जात होते.” त्याने पुढे सांगितले की, जेव्हा लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा फार कमी लोक शुद्धीवर होते. विशेष म्हणजे दुर्घटनेच्या वेळी तिथे पाऊस पडत नव्हता, परंतु समुद्र प्रचंड खवळलेला होता आणि लाटा खूप जोरदार होत्या.
घटनेची माहिती मिळताच ‘आन थोई सीमा रक्षक दलाने’ (An Thoi Border Guard) तात्काळ युद्धपातळीवर कारवाई सुरू केली. त्यांनी घटनास्थळी दोन मोठी जहाजे आणि ३५ पेक्षा अधिक अनुभवी अधिकारी व सैनिक रवाना केले. या मोहिमेत नौदल (Navy), तटरक्षक दल (Coast Guard) आणि स्थानिक मच्छीमार देखील सामील झाले होते. दुपारपर्यंत बचाव पथकाने स्पीडबोटमधील सर्व ३६ लोकांना समुद्रातून बाहेर काढून किनाऱ्यावर आणले. डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केल्यानंतर २१ जण सुखरूप वाचल्याचे सांगण्यात आले, तर दुर्दैवाने २ महिला आणि १३ पुरुषांसह एकूण १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली.