
Maharashtra Breaking News Updates Today
14 Jul 2026 09:40 AM (IST)
Pune Police Exclusive News: पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक पदांची तब्बल ३५ टक्के पदे रिक्त असून, त्यामुळे त्याचा थेट दैनंदिन कामकाजावर मोठा ताण पडत असल्याचे चित्र आहे. विशेषतः नव्याने सुरू करण्यात आलेले पोलिस ठाणी तसेच नियोजित ४० पोलिस चौक्या सुरू करण्याचे नियोजनही बारगळले आहे.
14 Jul 2026 09:30 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 14 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,290 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,099 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,717 रुपये आहे. भारतात 14 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,42,900 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,170 रुपये आहे. भारतात 14 जुलै रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 234.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,34,900 रुपये आहे.
14 Jul 2026 09:20 AM (IST)
तेहरान : इराण आणि अमेरिका या देशातील संबंध ताणले गेल्याचे दिसून येत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहे. याला इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. असे असताना आता होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण सागरी मार्गावरून जात असताना ‘मोम्बासा’ आणि ‘अल बहिया’ या दोन राष्ट्रीय तेलवाहू जहाजांवर इराणच्या दोन क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात ‘मोम्बासा’ जहाजावरील एक भारतीय कर्मचारी ठार झाला. इतर आठ जण जखमी झाले आहेत.
14 Jul 2026 09:10 AM (IST)
Ankit Sharma Murder Case : २०२० मधील ईशान्य दिल्लीतील भीषण दंगलीदरम्यान इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे तरुण अधिकारी अंकित शर्मा यांची झालेली क्रूर हत्या संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ठरली होती. या अत्यंत संवेदनशील आणि बहुचर्चित प्रकरणात दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयाने सोमवारी (१३ जुलै) एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने आम आदमी पार्टीचे (AAP) माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यासह पाच जणांना या हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे.
या अत्यंत संवेदनशील खटल्यामध्ये एकूण ११ आरोपींविरोधात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने यातील पुराव्यांचा सखोल अभ्यास करून ५ आरोपींना दोषी धरले, तर सबळ पुराव्यांअभावी उर्वरित ६ आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. ताहीर हुसेन यांच्यासोबतच न्यायालयाने नाझिम, जावेद, कासिम आणि अनस या इतर चार जणांना अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी जबाबदार धरत दोषी घोषित केले आहे.
14 Jul 2026 09:05 AM (IST)
Chembur Tree Fall Incident: चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात ३० जून रोजी एका शाळेच्या बसवर पिंपळाचे भलेमोठे झाड कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेप्रकरणी महापालिकेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. हा चौकशी अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालात झाडांच्या छाटणी आणि देखभालीमध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल कंत्राटदार आणि सल्लागार संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, या दुर्घटनेत महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
चौकशी समितीच्या शिफारशीनुसार, चेंबूर परिसरातील झाडांच्या सुरक्षेची आणि छाटणीची जबाबदारी असलेल्या मुख्य कंत्राटदाराला निष्काळजीपणाबद्दल ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच, कंत्राटदाराच्या कामावर योग्य देखरेख न ठेवल्याचा ठपका ठेवत संबंधित सल्लागार संस्थेला (Consultant) २ लाख रुपयांचा दंड करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
14 Jul 2026 09:00 AM (IST)
Tukaram Mundhe FDA Action: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका संपूर्ण राज्यात सुरूच असून, अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या धडक कारवाईचा थेट 'इफेक्ट' आता राज्याची उपराजधानी नागपुरात पाहायला मिळाला आहे. हॉटेलच्या किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य आढळल्याने एफडीएच्या पथकाने नागपुरातील तीन नामांकित आणि बड्या हॉटेल्सचे परवाने (Licenses) थेट रद्द केले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने नागपूर आणि परिसरातील ज्या तीन हॉटेल्सचे परवाने रद्द केले आहेत, त्यात खालील हॉटेल्सचा समावेश आहे:
इंडियन तंदूर (काटोल रोड)
द हट फॅमिली रेस्टॉरंट (जगदीशनगर)
फॅमिली गार्डन रेस्टॉरंट (फेटरी)
14 Jul 2026 08:55 AM (IST)
Newlywed bride Accident Death: लग्नाच्या आनंदावर अवघ्या सहा दिवसांतच दु:खाची अत्यंत काळी छाया पसरल्याची एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना सोमवारी (१३ जुलै) जळगाव शहरात घडली आहे. माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या २१ वर्षीय नवविवाहितेचा भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. वैशाली भाऊसाहेब पाटील असे या मृत नवविवाहितेचे नाव आहे. या भीषण अपघातात तिचे काका रावसाहेब पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
वैशाली यांचा विवाह ७ जुलै रोजी अत्यंत थाटामाटात आणि उत्साही वातावरणात पार पडला होता. लग्नानंतरचे सर्व विधी आणि देवदर्शन आटोपून नुकत्याच घरी परतलेल्या वैशाली सोमवारी आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, नियतीने त्यांच्यावर वाटेतच घाला घातला.
14 Jul 2026 08:50 AM (IST)
Pune Revenue Officers Suspended: महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील (MLRC) कलम १५५ चा सर्रास गैरवापर केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर, महसूल विभागाने अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. याप्रकरणी राज्यातील १५ महसूल अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या थेट आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
14 Jul 2026 08:45 AM (IST)
Maharashtra Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या विविध भागांत धुमाकूळ घालणाऱ्या मान्सूनने आता तात्पुरती विश्रांती घेतली आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरडे वातावरण निर्माण झाले असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. येत्या काही दिवसांत राज्यात केवळ हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकल्याने त्याने अरबी समुद्र आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग व्यापला होता.
14 Jul 2026 08:40 AM (IST)
India vs England ODI Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेला उद्यापासून (१४ जुलै) सुरुवात होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला ४-० ने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला होता. या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे. या आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे भारताचे दिग्गज खेळाडू मैदानात पुनरागमन करत आहेत. पुढील महत्त्वाच्या स्पर्धांच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात असतानाच, कर्णधार शुभमन गिलने सरावादरम्यान विराट कोहलीसोबत झालेल्या विशेष चर्चेचा खुलासा केला आहे.
14 Jul 2026 08:35 AM (IST)
तेहरान : इराण आणि अमेरिका या देशातील संबंध ताणले गेल्याचे दिसून येत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहे. याला इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. असे असताना आता होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण सागरी मार्गावरून जात असताना ‘मोम्बासा’ आणि ‘अल बहिया’ या दोन राष्ट्रीय तेलवाहू जहाजांवर इराणच्या दोन क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात ‘मोम्बासा’ जहाजावरील एक भारतीय कर्मचारी ठार झाला. इतर आठ जण जखमी झाले आहेत. इराणने केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे दोन्ही जहाजांना आग लागली, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. मात्र, आग आता नियंत्रणात आणण्यात आली आहे. वाचा सविस्तर-
Pune Police Exclusive News: पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक पदांची तब्बल ३५ टक्के पदे रिक्त असून, त्यामुळे त्याचा थेट दैनंदिन कामकाजावर मोठा ताण पडत असल्याचे चित्र आहे. विशेषतः नव्याने सुरू करण्यात आलेले पोलिस ठाणी तसेच नियोजित ४० पोलिस चौक्या सुरू करण्याचे नियोजनही बारगळले आहे.
पुणे आयुक्तालयाने शहरातील पोलिसिंग अधिक प्रभावी तसेच सर्व सामान्य नागरिकांना जलद प्रतिसाद मिळावा यासाठी नुकतेच नवीन ७ पोलिस ठाणी सुरू केली. आयुक्तालयाच्या अखत्यारीत ४४ पोलिस ठाणे, एक सायबर पोलिस ठाणे आणि ११० पोलिस चौक्या कार्यरत आहेत. शहराचा सातत्याने होत असलेला विस्तार, नव्याने समाविष्ट होणारे भाग, वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि बदलते गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेऊन प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन पोलिस चौक्या असाव्यात.