अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री 10 च्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन गट आमने सामने आले. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी एकूण १६आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या अचलपूर आणि परतवाडा शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
[read_also content=”किरिट सोमय्यांची आजपासून सलग चार दिवस चौकशी, अकरा ते दुपारी दोनपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार चौकशी https://www.navarashtra.com/maharashtra/kirit-somaiya-will-be-interrogated-for-four-consecutive-days-from-today-from-11-to-2-pm-270327.html”]
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये रात्री दोन गटात झालेल्या राड्यानंतर अचलपूर व परतवाडा या दोन्ही शहरात कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक स्वतः परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. पोलिसांनी शहरता कडक बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. दरम्यान या प्रकरणी अचलपूर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १६आरोपींना अटक करण्यात आली आहे,सकाळी अचलपूर व परतवाडा मध्ये शुकशुकाट दिसून आला.
सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून ठीक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,जिल्ह्यातील अतिसंवेदनशील अचलपूर व परतवाडा शहर म्हणून म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथे रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास झेंडा काढण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला.तर परिस्थिती शांत असून कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस उपअधीक्षक शशिकांत सातव यांनी केले आहे.
[read_also content=”कामाची बातमी! बँकांच्या वेळेत बदल, आजपासून बँका ९ वाजल्यापासूनच खुल्या राहणार, ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी अधिकचा एक तास मिळणार https://www.navarashtra.com/business/banks-will-be-open-from-9-am-onwards-customers-will-get-one-more-hour-to-transact-270332.html”]