
Ramdas Athawale Sharad Pawar NDA, NCP Sharadchandra Pawar Mahayuti, Sharad Pawar
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट एनडीए मध्ये सामील होणार असल्या्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अंतर्गत बैठकाही सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील शरद पवार यांना थेट एनडीएमध्ये सामील होण्याचीऑफर दिली आहे.
नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आठवले म्हणाले की, ‘2014 मध्येच शरद पवार यांना एनडीएमध्ये सामील होण्याी ऑफर दिली होती. पण त्यावेळी ते आले नाहीत. 2014 मध्ये शरद पवार एनडीएमध्ये आले असते तर तेव्हाच राष्ट्रपती झाले असते.’
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते २०१४ किंवा २०१९ मध्ये महायुतील आले असते तर राष्ट्रपतीपदासाठी त्यांचा विचार होऊ शकला असता. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतील विलीन करावी, असं मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं. तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. सोनिया गांधी यांच्याबरोबर संबंध चांगले वाढवले होते, त्यामुळे मनमोहन सिंग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळी शरद पवार यांना पंतप्रधानपद मिळू शकले असते, असे रामदास आठवले म्हणाले.
शरद पवार एनडीएमध्ये आले असते आणि त्यांना राष्ट्रपती व्हायचेय, असा प्रस्ताव ठेवला असता तर नरेंद्र मोदींनीही कदाचित त्यांचा प्रस्ताव मान्य केला असा. अताही ते एनडीएमध्ये येऊ शकतात. आमचा पक्ष वेगळा आहे आणि भाजप वेगळी आहे. पण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत.
शरद पवारांनी आजही एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यांच्याकडे आठ खासदार आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवार यांनी निर्णय घ्यावा. आम्ही त्यांचं एनडीएमध्ये स्वागतच करू, असे रामदास आठवले म्हणाले. शरद पवार आमच्यासोबत आले तर आम्हाला अभिमान राहणार आहे. ते आलेतर एनडीएलाच फायदा होणार आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
भाजपकडून विरोधी पक्षांमध्ये फोडाफोडी केली जात असल्याच्या आरोपांवर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार स्वतःहून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येत आहेत. आमच्याकडे खासदार स्वतःहून येत आहेत. त्यामुळे आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. प्रत्येक खासदाराला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने काम करायचे आहे. त्यामुळे विविध पक्षांतील खासदार आमच्यासोबत येत आहेत. आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही.”