Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील उपोषणाची धग आता मुंबईत! सोनम वांगचुक यांच्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर; ९ जुलैला शिवतीर्थावर जमण्याचे जाहीर आवाहन

Aaditya Thackeray: नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. १९ जुलै रोजी शिवतीर्थावर एकत्र येण्याचे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 16, 2026 | 05:51 PM
सोनम वांगचुक यांच्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर (Photo Credit- X)

सोनम वांगचुक यांच्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील उपोषणाची धग आता मुंबईत!
  • सोनम वांगचुक यांच्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर
  • ९ जुलैला शिवतीर्थावर जमण्याचे जाहीर आवाहन
मुंबई: देशभरातील वैद्यकीय प्रवेशाला हादरवून सोडणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून आता मुंबईत मोठे जनआंदोलन उभे ठाकले आहे. गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आणि १९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ आता उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) थेट रस्त्यावर उतरले आहेत.
देशभरातल्या तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक जी आणि अभिजीत दिपके व तमाम युवकांना पाठिंबा देण्यासाठी, निष्ठूर भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी, चला एकत्र येऊया! १९ जुलै, रविवारी, शिवतीर्थावर, मॉंसाहेब मिनाताई ठाकरे ह्यांच्या पुतळ्याजवळ ४ वाजता भेटूया! हा लढा सर्वांचा… pic.twitter.com/4MQJ36ktQY — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2026


या ऐतिहासिक लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी १९ जुलै (रविवार) रोजी दुपारी ४:०० वाजता शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येण्याचे खुले आवाहन केले आहे. “हा लढा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून, देशातील लाखो तरुणांच्या भविष्याचा आहे,” असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, “ज्या मुद्द्यासाठी सोनम वांगचुक दिल्लीत गेल्या १९ दिवसांपासून अन्नपाण्याविना उपोषण करत आहेत, त्याकडे भाजप सरकार ज्या असंवेदनशीलतेने पाहत आहे, त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते: या सरकारला तरुण भारताच्या भविष्याची आणि त्यांच्या स्वप्नांची अजिबात काळजी नाही.”

दिल्ली मध्ये @Wangchuk66 जी ज्या कारणासाठी उपोषण करत आहेत, त्या प्रश्नाविषयी भाजप सरकारची असंवेदनशीलता एकच गोष्ट सिद्ध करते की, या सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही. त्यांची अत्यंत साधी मागणी आहे, पेपरफुटीप्रकरणी अपयशी ठरलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांना… — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2026


नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थेट जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी करत ठाकरे म्हणाले, “वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षेतील पेपरफुटीसारख्या गंभीर आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या घटनेनंतरही, असा अकार्यक्षम केंद्रीय मंत्री जगातल्या कोणत्याही लोकशाही देशात पदावर राहिला नसता. पण इथे त्यांना अजूनही पदावरून हटवले गेलेले नाही.”

सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या लढ्याला राज्यातून मोठे बळ

नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह बाधित विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक मदत मिळावी, या मागण्यांसाठी अभिजित दिपके यांनी दिल्लीत २५ दिवसांपूर्वी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा देत थेट आमरण उपोषण सुरू केले आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता, तर आता आदित्य ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून जनआंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. भाजपच्या सत्तेच्या राजकारणावर निशाणा साधताना आदित्य ठाकरे शेवटी म्हणाले, “पेपरफुटीचा प्रश्न असो, इथेनॉलचे धोरण असो किंवा मंदिरांचे वाद असोत… भाजपचे एकच धोरण राहिले आहे; ते म्हणजे लोकांमध्ये फूट पाडणे आणि कोणत्याही मार्गाने स्वतःची सत्ता टिकवणे. मात्र, आता देशातील तरुण गप्प बसणार नाहीत.”

Web Title: Aditya thackeray takes to the streets in support of sonam wangchuk issues a public appeal to gather at shivtirth on july 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • abhijeet dipke
  • Maharashtra Politics
  • Shivaji Park
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘तर शरद पवार तेव्हाच राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवलेंची शरद पवारांना थेट NDA मध्ये येण्याची ऑफर!
1

Maharashtra Politics: ‘तर शरद पवार तेव्हाच राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवलेंची शरद पवारांना थेट NDA मध्ये येण्याची ऑफर!

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
2

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

राम मंदिर प्रकरणात गोविंद गिरींचीही चौकशी व्हावी; संजय राऊत यांची मागणी
3

राम मंदिर प्रकरणात गोविंद गिरींचीही चौकशी व्हावी; संजय राऊत यांची मागणी

‘सीता के पति…’; जंतर-मंतरवरील कुणाल कामराच्या वक्तव्यावरून नवा वाद, अभिजित दीपकेवरही नेटकऱ्यांचा निशाणा
4

‘सीता के पति…’; जंतर-मंतरवरील कुणाल कामराच्या वक्तव्यावरून नवा वाद, अभिजित दीपकेवरही नेटकऱ्यांचा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.