Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम

हल्ल्याला 17 वर्षे झाली असली तरीही जखम मुंबईकरांच्या मनात अजूनही कायम आहे. हल्ला होऊन इतका काळ उलटूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची सुरक्षा व्यवस्था आजही रामभरोसेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 26, 2025 | 08:28 AM
26/11 Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम

26/11 Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईत 17 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याची फक्त भारतातच नाहीतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या हल्ल्याला 17 वर्षे झाली असली तरीही जखम मुंबईकरांच्या मनात अजूनही कायम आहे. हल्ला होऊन इतका काळ उलटूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची सुरक्षा व्यवस्था आजही रामभरोसेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सीएसएमटी स्थानकाला 26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पहिले लक्ष्य केले होते. या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. काही प्रमाणात त्या लागू करण्यात आल्या; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्या अपुऱ्या आहेत. स्थानकातून रोज लोकलच्या १८१० फेऱ्या होतात. लांब पल्याच्या १०० मेल-एक्सप्रेसची ये-जा होते. लोकल आणि मेल एक्सप्रेसमधून सुमारे १२ लाख प्रवासी ये-जा करतात. या स्थानकात तीन प्रवेशद्वार आहेत; मात्र, यातील दोन प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर मशिन नाहीत. फक्त बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी असलेल्या प्रवेशद्वारावर या मशिन प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्याआधी लावल्या आहेत.

हेदेखील वाचा : BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले

लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर पुरेसे सुरक्षारक्षक नाहीत. स्थानकांवर डोअर मेटल डिटेक्टरची नियमित देखभाल केली जात नसल्याने ते बंद आहेत. मुंबईवरील या हल्ल्यात कामा रुग्णालय, सीएसएमटी रेल्वेस्थानक, ताज हॉटेलसह २ लक्झरी हॉटेल्सना अतिरेक्यांनी लक्ष्य केले होते. हल्ल्यात १६६ लोक मारले गेले, तर ३०० वर जखमी झाले होते.

अनेक ठिकाणी बॅग स्कॅनर बंद

सीएसएमटीवर सध्या एकच बॅग स्कॅनर शिल्लक आहे. इतर स्कॅनर बंद पडल्याने काढून टाकण्यात आले. डोअर मेटल डिटेक्टर गायब झाले. हॅण्ड मेटल डिटेक्टर उपलब्ध नाहीत. या मशीन बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी, पनवेल येथेही स्कॅनर लागणार आहे. मात्र, या सुरक्षा यंत्रणांची प्रतिक्षा कायम आहे.

Web Title: 17 years completed for mumbai terror attacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:28 AM

Topics:  

  • 26 11 Terror Attack
  • Mumbai Attack
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”
1

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

पाकिस्तानचा देशातील प्रत्येक भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न; CM देवेंद्र फडणवीसांचा सावधानतेचा इशारा
2

पाकिस्तानचा देशातील प्रत्येक भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न; CM देवेंद्र फडणवीसांचा सावधानतेचा इशारा

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या
3

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

‘हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त; मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन!
4

‘हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त; मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.