Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: शिंदे गटाच्या वाटेवर असलेले ठाकरे गटाचे ते खासदार कोण?

Maharashtra Breaking News-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दुसऱ्यांदा मोठी फूट पाडून विरोधी पक्षातील गट फोडण्याची आपली राजकीय क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, ज्यामुळे त्यांचे राज्य आणि केंद्राच्या राजकारणातील वजन कमालीचे वाढणार आहे

  • By anuradha sagar
Updated On: Jun 17, 2026 | 10:51 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 17 Jun 2026 10:51 AM (IST)

    17 Jun 2026 10:51 AM (IST)

    परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी थेट इंटरनेटच बंद?

    २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्राम (Telegram) ॲपवर लावलेली तात्पुरती बंदी सध्या जोरदार चर्चेत आहे. परीक्षेच्या संदर्भातील खोट्या अफवा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, टेलिग्रामला ३० जून २०२६ पर्यंत त्यांचे ‘मैसेज एडिट फीचर’ (Message Edit Feature) देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून आधीच पाठवलेले संदेश एडिट करून संभ्रम पसरवता येणार नाही.

  • 17 Jun 2026 10:41 AM (IST)

    17 Jun 2026 10:41 AM (IST)

    ‘अमेरिकेशिवाय इस्रायलचं अस्तित्व नाहीच’ ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इशारा

    फ्रान्सच्या  बियारित्झमध्ये G7 परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. दरम्यान या जागतिक व्यासपीठावरुन ट्रम्प यांनी थेट इस्रायलवर निशाणा साधला. त्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांवर तीव्र संताप व्यक्क केला. तसेच अमेरिकेमुळे इस्रायलचे अस्तित्व नसल्याचे म्हटले.

  • 17 Jun 2026 10:31 AM (IST)

    17 Jun 2026 10:31 AM (IST)

    कोलकात्यात अरबाज खानसोबत घडला धक्कादायक प्रकार; कारमध्ये जाऊन बसला अज्ञात व्यक्ती

    कोलकातामध्ये बॉलिवूड अभिनेता आणि सुपरस्टार सलमान खानचा भाऊ, अरबाज खान याच्याशी संबंधित एक विचित्र आणि भीतीदायक घटना घडली. या घटनेत सुरक्षेतील एक मोठी त्रुटी दिसून आली. ५८ वर्षीय अरबाज खान कोलकातामध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित होता, तेव्हा तो निघत असताना एका व्यक्तीने जबरदस्तीने त्याच्या गाडीत प्रवेश केला, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये अरबाज खान, धक्का बसलेल्या अवस्थेत दिसत आहे. मात्र, सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला गाडीतून बाहेर काढले. यानंतर त्यांच्यात झटापट झाली, ज्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली.

  • 17 Jun 2026 10:21 AM (IST)

    17 Jun 2026 10:21 AM (IST)

    केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल होऊन वाटचाल ठप्पच; देशभरात पावसाची मोठी तूट

    गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच केरळमध्ये वेळेआधी दाखल होऊनही नैऋत्य मान्सूनची देशभरातील वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी, देशातील अनेक भागांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेती, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

  • 17 Jun 2026 10:11 AM (IST)

    17 Jun 2026 10:11 AM (IST)

    संचिता उगलेची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक; उपचारांचा होत नव्हता परिणाम

    टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला आहे. १४ जून रोजी पालघरच्या नालासोपारा येथील तिच्या घरी ति मृतावस्थेत आढळली. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. संचिता ‘कुमकुम भाग्य’, ‘वागळे की दुनिया’ आणि ‘दिलवाली दुल्हा ले जाएंगे’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली होती. सध्या तिच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे मानले जात आहे, परंतु कुटुंब, मित्र आणि सहकलाकारांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे हे प्रकरण वादात सापडले आहे. दरम्यान, तिचे व्हॉट्सॲप चॅट्सही समोर आले आहेत.

  • 17 Jun 2026 10:01 AM (IST)

    17 Jun 2026 10:01 AM (IST)

    ‘त्या मला मारून टाकतील’ भीती ठरली खरी? पत्नी आणि चार मुलींनी मिळून वडिलांची केली हत्या

    जालना येथून एक धक्कादायक घटना समोर आली. पत्नी आणि चार मुलींनी मिळून आपल्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथे घडली. या प्रकरणी मृतकाच्या सावत्र भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पत्नीसह चार मुलींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

  • 17 Jun 2026 09:50 AM (IST)

    17 Jun 2026 09:50 AM (IST)

    PM मोदींनी परिषदेत उपस्थित केला भारतीय नाविकांच्या मृत्यूचा मुद्दा

    मंगळवारी (१६ जून) जागतिक स्तरावरली बहुपक्षीय संघटना G7 च्या परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग नोंदवला असून या जागतिक व्यावसपीठावर त्यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी मजबूत करण्यावर आणि राष्ट्रांमध्ये परस्पर विश्वास वाढविण्यावर भर दिला.

  • 17 Jun 2026 09:40 AM (IST)

    17 Jun 2026 09:40 AM (IST)

    गेममध्ये नवा फेडेड व्हिल ईव्हेंट लाईव्ह!

    फ्री फायर मॅक्समध्ये गोल…. अ‍ॅनिमेशन मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. कारण गेममध्ये प्लेअर्ससाठी नवा फेडेड व्हिल ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक दमदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. फेडेड व्हिल ईव्हेंटमध्ये तुमच्यासमोर 10 इन-गेम वस्तूंची यादी येणार आहे. मात्र यापैकी तुम्हाला 2 अशा वस्तूंची निवड करावी लागणार आहे, ज्या तुम्हाला नको आहेत. यानंतर यादीमधील उर्वरित 8 वस्तूंसाठी तुम्ही तुमचे नशिब आजमावू शकता.

  • 17 Jun 2026 09:32 AM (IST)

    17 Jun 2026 09:32 AM (IST)

    सोनं-चांदी झालं स्वस्त!

    भारतात 17 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,136 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,874 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,352 रुपये आहे. भारतात 17 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,38,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,51,360 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,520 रुपये आहे. भारतात 17 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 264.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,64,900 रुपये आहे.

  • 17 Jun 2026 09:05 AM (IST)

    17 Jun 2026 09:05 AM (IST)

    Tukaram Mundhe News: माजी मंत्र्यांकडून तुकाराम मुंढेंचे अनोख्या पद्धतीने कौतुक करत मोठी मागणी

    Tukaram Mundhe News: राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्तपद स्वीकारताच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी गेल्या महिनाभरात अवैध गुटखा विक्रेते, अन्न भेसळदार, हॉटेल्स आणि औषध दुकानांवर जोरदार कारवाईचा धडाका सुरू केल्याने संबंधित क्षेत्रातील गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंढे यांच्या या धडक मोहिमेचे राज्यभरातून स्वागत होत असून शेतकऱ्यांनी चक्क त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत कौतुक केले आहे; त्यातच आता राज्याच्या एका माजी मंत्र्यांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीची हटके स्टाईलने प्रशंसा करत थेट एका वेगळ्याच आणि मोठ्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

  • 17 Jun 2026 09:00 AM (IST)

    17 Jun 2026 09:00 AM (IST)

    Vaibhav Suryavanshi Controversy: युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी मैदानातील वादामुळे चर्चेत 

    Vaibhav Suryavanshi Controversy: श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेत भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हा आपल्या उत्कृष्ट खेळाऐवजी मैदानातील एका वादामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. श्रीलंका 'अ' संघाविरुद्धचा सामना संपल्यानंतर वैभवने केलेल्या एका कृत्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावरून कडाडून टीका केली जात आहे; त्यातच आता या वादात श्रीलंकेच्या एका माजी क्रिकेट व्यवस्थापकाने भारतीय खेळाडूबाबत अत्यंत वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याने क्रीडा जगतात नवा वाद पेटला आहे.

  • 17 Jun 2026 08:55 AM (IST)

    17 Jun 2026 08:55 AM (IST)

    Shiv Sena Anniversary: शिवसेनेच्या वर्धापनदिनी ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात  प्रवेश करणार

    Shiv Sena Anniversary:  येत्या १९ जून रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भव्य वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला असून, याच मेळाव्यात ठाकरे गटाचे सहा खासदार अधिकृतरित्या शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त गाठीभेटींनंतर, संसदेत स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारी दोन तृतीयांश म्हणजेच ९ पैकी ६ खासदारांची संख्या गाठल्यानंतरच हे बंडखोर खासदार मुख्यमंत्री शिंदेंसोबत दिल्लीला रवाना झाले होते. कायदेशीर अटींची पूर्तता करून पक्षप्रवेशाची पूर्ण तयारी झाली असून, या बंडखोर खासदारांच्या गटाला केंद्रात एक महत्त्वाचे मंत्रिपद मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.

Maharashtra to National And International Breaking News:

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटाच्या वाटेवर

दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर प्रत्यक्षात येण्याची चिन्हे असून, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ६ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेले हे सहा खासदार बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन आपला पाठिंबा शिंदे गटाला असल्याचे स्पष्ट करणार असून, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. लोकसभेतील या संभाव्य बंडखोरीच्या बदल्यात फुटीर खासदारांच्या या गटाला केंद्रात एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, संजय जाधव आणि संजय दिना पाटील दिल्लीत दाखल झाले असून, या बंडखोरीला रोखण्यासाठी ठाकरे गटाकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षातील हे संकट दूर करण्यासाठी अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत संकटमोचकाच्या भूमिकेत सक्रिय झाले असून, राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

 

 

Web Title: 17th june2026 live breaking news marathi maharashtra politics national international politics crime sports monsoon update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ठाकरे गटातील ६ खासदारांच्या ‘या’ दिवशी होणार शिंदे गटात पक्षप्रवेश
1

Maharashtra Politics: ठाकरे गटातील ६ खासदारांच्या ‘या’ दिवशी होणार शिंदे गटात पक्षप्रवेश

Pratap Sarnaik: …तर आमचे दरवाजे २४ तास उघडे’, ऑपरेशन टायगर’वरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं सर्वात मोठं विधान
2

Pratap Sarnaik: …तर आमचे दरवाजे २४ तास उघडे’, ऑपरेशन टायगर’वरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं सर्वात मोठं विधान

Maharashtra politics : नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपाचा व्हीप जारी; ५२ नगरसेवक सहलीसाठी रवाना
3

Maharashtra politics : नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपाचा व्हीप जारी; ५२ नगरसेवक सहलीसाठी रवाना

Maharashtra Politics : ‘…तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल’; शंभूराज देसाईंचं मोठं विधान
4

Maharashtra Politics : ‘…तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल’; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.