Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ठाकरे गटातील ६ खासदारांच्या ‘या’ दिवशी होणार शिंदे गटात पक्षप्रवेश

Maharashtra Politics: ठाकरे गट किंवा शिंदेसेना यांच्याकडून या घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि दावे हे प्रामुख्याने सूत्रांच्या माहितीनुसार आहेत. आगामी काही दिवसांत संबंधित खासदारांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 17, 2026 | 11:02 AM
Maharashtra Politics: ठाकरे गटातील ६ खासदारांच्या ‘या’ दिवशी होणार शिंदे गटात पक्षप्रवेश
Follow Us
Follow Us:
  • ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात
  • १९ जून रोजी मुंबईतील NESCO Exhibition Centre येथे अधिकृत प्रवेश
  • सर्व ६ खासदार सध्या ‘नॉट रिचेबल’
 

 

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे खासदार सध्या दिल्लीत असून ते लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या हालचालींबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिल्लीत, आज निर्णय…

वर्धापन दिन मेळाव्यात प्रवेशाची शक्यता

शिंदेसेनेचा वर्धापन दिन १९ जून रोजी मुंबईतील NESCO Exhibition Centre येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ठाकरे गटातील काही खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. वर्धापन दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे.

गुप्त बैठका आणि राजकीय हालचाली

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील काही खासदारांमध्ये पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. संसदीय नियमांनुसार गटाला मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक संख्याबळाची अट पूर्ण झाल्यानंतरच पुढील राजकीय पावले उचलली जातील, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

मोठी बातमी! 6 खासदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ? संजय राऊत, अनिल देसाई दिल्लीला रवाना

अधिकृत भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, ठाकरे गट किंवा शिंदेसेना यांच्याकडून या घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि दावे हे प्रामुख्याने सूत्रांच्या माहितीनुसार आहेत. आगामी काही दिवसांत संबंधित खासदारांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. या संभाव्य घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेनेतील आगामी घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सध्या हे सहा खासदार दिल्लीत असल्याची माहिती असून हे सर्वजण ६ खासदार सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. हे सहा खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे गटात सामील होणाऱ्या बंडखोर आमदारांच्या गटाला केंद्रातील मोदी सरकारमध्ये एक मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, खासदार फुटणार असल्याचे स्पष्ट होताच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून कोणत्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये, अशी विनंती केली आहे. तसेच, संजय राऊत यांनी या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगत सर्व खासदार निष्ठावान असल्याचा दावा केला आहे.

 

 

Web Title: Maharashtra politics thackeray group 6 mps join shinde faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Om Birla
  • Operation Tiger
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात
1

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात

Uddhav Thackeray हाजीर हो! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?
2

Uddhav Thackeray हाजीर हो! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Breaking News Live Updates Today:  शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

Maharashtra Breaking News Updates Today: परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
4

Maharashtra Breaking News Updates Today: परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.