Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ‘…तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल’; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

पालकमंत्री म्हणून त्यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 16, 2026 | 08:19 AM
Maharashtra Politics : '...तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल'; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

Maharashtra Politics : '...तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल'; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

सातारा : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत नाशिक आणि सांगली-सातारा मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. विशेषतः सांगली-सातारा मतदारसंघातील महायुतीच्या भाजप उमेदवाराला पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागू शकते. याचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झालेला वाद शिवसेना नेते विसरलेले नाहीत. त्याचवेळी, कॅबिनेटमंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

देसाई म्हणाले की, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान भाजपने समन्वय साधला नाही. सध्याच्या परिस्थितीचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. भाजपने सांगली-सातारा विधान परिषद जागेसाठी धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेबद्दल शिंदे गटाचा रोष अजूनही ओसरत असल्याचे दिसत आहे.

Aaditya Thackeray : आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या महायुती समन्वय बैठकीतील शंभूराज देसाई यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता, देसाई म्हणाले की, पालकमंत्री म्हणून त्यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

देसाई म्हणाले, जेव्हा पालकमंत्री समन्वय साधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तुम्ही बैठकीला उपस्थित राहिला नाहीत. इतकेच नाही, तर समन्वय बैठकीदरम्यानच भाजपने एकट्याने निवडणूक लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला. तुमची वृत्ती अशीच राहिली, तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल, असेही म्हटले आहे.

नगरसेवक, झेडपी सदस्यांना एकत्रित दौऱ्यावर नेण्याची योजना

शंभूराज देसाई यांनी सांगितले की, विधान परिषद निवडणुका लक्षात घेता, भाजपने आपले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती अध्यक्षांना एकत्रित दौऱ्यावर नेण्याची योजना आखली आहे.

येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू

दुसरीकडे, सध्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी झालेली आहे, असे देसाई यांनी यापूर्वी म्हटले होते. आम्हाला जर कोणत्याही बैठकांचं निमंत्रणच नाही तर आम्ही मग कोणत्या गाडीत बसायचं असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी खेडेगावात प्रचलित असलेल्या म्हणीचा संदर्भ देत येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी महायुतीमध्ये अवस्था असल्याचं बोलून दाखवलं.

Web Title: Minister shambhuraj desai statement about current politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • Shambhuraj Desai
  • Shivsena Politics

संबंधित बातम्या

‘मोदी सरकार दबाव आणि भीतीचं राजकारण करतंय’; नाना पटोलेंचे टीकास्त्र
1

‘मोदी सरकार दबाव आणि भीतीचं राजकारण करतंय’; नाना पटोलेंचे टीकास्त्र

Abhijit Dipke Jaipur assault: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण
2

Abhijit Dipke Jaipur assault: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण

भाजप-राष्ट्रवादीचे ‘तळ्यात मळ्यात; स्पष्ट बहुमत असूनही ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग; महायुतीला क्रॉस व्होटिंगची धास्ती?
3

भाजप-राष्ट्रवादीचे ‘तळ्यात मळ्यात; स्पष्ट बहुमत असूनही ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग; महायुतीला क्रॉस व्होटिंगची धास्ती?

Maharashtra Politics : रामदास आठवलेंनी थेट शरद पवारांनाच दिली ‘ही’ मोठी ऑफर; राजकीय चर्चांना उधाण
4

Maharashtra Politics : रामदास आठवलेंनी थेट शरद पवारांनाच दिली ‘ही’ मोठी ऑफर; राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.