
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
22 Jul 2026 09:23 AM (IST)
टेक कंपनी सॅमसंगचा बहुप्रतिक्षित सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंट 2026 आज म्हणजेच 22 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. साऊथ कोरियन कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या ईव्हेंटमध्ये लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन्स आणि स्मार्टवॉच्या नवीन लाईनअप लाँच केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी काही निवडक मार्केट्समध्ये सॅमसंग गॅलेक्सी कार्ड देखील लाँच करू शकते. लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या ईव्हेंटमध्ये सॅमसंग त्यांचे बहुप्रतिक्षित प्रोडक्ट्स लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ईव्हेंटचे स्ट्रिमिंग कुठे होणार आहे आणि तुम्ही हा ईव्हेंट कधी पाहू शकता, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
22 Jul 2026 08:26 AM (IST)
CJP Protest Live: केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी सायंकाळी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात जाऊन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सफदरजंग रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर वांगचुक यांना पुढील उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन वांगचुक यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. 'संसद मार्च' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आणि वांगचुक यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
22 Jul 2026 08:24 AM (IST)
नवी दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली आहे. CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांनी त्यांचे व्हॉट्सॲप खाते अचानक ब्लॉक झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या कारवाईनंतर त्यांनी थेट मेसेजिंग प्लॅटफॉर्मलाच धारेवर धरत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
सौरभ दास यांनी आपल्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या अधिकृत हँडलवरून पोस्ट करत या कारवाईबाबत तीव्र आश्चर्य आणि विरोध व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले:
"माझे व्हॉट्सॲप खाते ब्लॉक करण्यात आले आहे! व्हॉट्सॲप मला सांगू शकेल का की त्यांनी हे का आणि नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून किंवा निर्देशावरून केले आहे?"
22 Jul 2026 08:19 AM (IST)
VIDEO | Delhi: Morning visuals from Jantar Mantar.
In a dramatic turn of events, opposition leaders, including Congress's Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra and Samajwadi Party's (SP) Akhilesh Yadav, were forcibly removed by police on Tuesday after they staged a dharna outside… pic.twitter.com/IBIEwdskn6
— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2026
संसद भवन परिसरात २० जुलैला झालेल्या प्रचंड गदारोळानंतरही कॉकरोच जनता पार्टीने आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून सीजेपीचे हे आंदोलन सुरू आहे. खास बाब म्हणजे देशभरातून विरोधी पक्षनेते आता जंतरमंतरवर पोहचताना दिसत आहेत. काल ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. देशभरातून या आंदोलनाचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.