Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणुकीचे आमिष दाखवून 300 जणांची 26 कोटींची फसवणूक

मसाला आणि सुका मेवा याच बरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करत निर्यात करण्याचे काम हि फर्म करते असे सर्वत्र भासवले जात होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 17, 2024 | 03:08 PM
गुंतवणुकीचे आमिष दाखवून 300 जणांची 26 कोटींची फसवणूक
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : शेती उत्पदनात गुंतवणूक करा महिना ५ टक्के नफा आणि ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत अशी आकर्षक जाहिरात करीत एका कंपनीने एजंटद्वारे ३०० लोकांची २६ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार करीत संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत एपीएमसी पोलीस तपास करीत होते. अखेर पोलिसांनी वेगात तपासचक्र राबवत तीन जणांना अटक केली तर एकाचा शोध सुरू आहे.

नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव सचिन भिसे असे यातील आरोपींची नावे असून यापैकी मुख्य आरोपी पार्टे आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे तर एकाच शोध सुरु आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील उरण येथे काही महिन्यापूर्वी कोट्यवधींचा चिटफंड घोटाळा समोर आला होता. या प्रकरणी स्वतः पोलिसांनी पुढाकार घेत कारवाई केली व आरोपींना गजाआड केले. आता अशाच प्रकारचा चिटफंड घोटाळा समोर आला आहे. नितीन पार्टे संचालक असलेली रुद्रा ट्रेडर्स नावाची फर्म आहे. वाशीतील सर्वात आलिशान व्यावसायिक संकुल म्हणून ओळख असलेल्या सतरा प्लाझा या ठिकाणी त्याचे कार्यालय आहे. मसाला आणि सुका मेवा याच बरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करत निर्यात करण्याचे काम हि फर्म करते असे सर्वत्र भासवले जात होते.

याशिवाय पार्टे हा लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाच्या पतसंस्थेचा संचालक हि आहे. या दोन्हीच्या जीवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटी रुपयांची फसवणूक केली. आम्ही थेट शेतात बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करून निर्यात करतो त्यामुळे नफा फार मोठा मिळतो. तुम्हीही गुंतवणूक करा. जेवढी गुंतवणूक त्याच्या पाच टक्के दर महिन्यात परत मिळणार तसेच गुंतवलेली मूळ रक्कम ११ महिन्यांनी मिळणार असे आमिष दाखवून पैसे घेतले जात होते. हा व्यवहार पारदर्शक आहे हे भासवण्यासाठी लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे धनादेश, फिक्स डिपॉजिट बॉण्ड गुंतवणूक दारांना दिले जात होते. हा सर्व प्रकार मार्च २०२२ पासून सुरु होता. मात्र परताव्याचे पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे घेतले ते उडवा उडवीचे उत्तरे देतात त्यात मुख्य आरोपी पार्टे हा बहुतांश वेळेस देशाबाहेर असतात. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री अनेकांना पटली.

अखेर याबाबत काही दिवसांपूर्वी महेंद्र डेरे या गुंतवणूक दराने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याची तात्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी पथकाने अगोदर सर्व प्रकराची शहानिशा करत गुरुवारी रात्री आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी पुढाकार घेत एपीएमसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन एपीएमसी पोलिसांनी केले आहे.

सदर गुन्ह्याची व्याप्ती ही जास्त असल्याने व यातील आरोपी बऱ्याच वेळा परदेशवारी करत असल्याने त्यांना अटक करणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, पोलीस हवा भगत, बोराटे, वाटकर, काळे यांच्या पथकाने आरोपी यांना 24 तासाच्या आत ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक हे करीत आहेत.

Web Title: 26 crore fraud of 300 people by luring investment navi mumbai crime case thane maharashtra thane police navi mumbai police maharashtra police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2024 | 03:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • Navi Mumbai
  • Navi mumbai News Update
  • thane

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड
1

Navi Mumbai Crime: चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
2

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी
3

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
4

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.