तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा (Tuljabhavani) शारदीय नवरात्र महोत्सव (Navratri Mahotsav) उत्साहात पार पडला. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवातील पहिल्या टप्प्यातील नऊ दिवसांमध्ये भाविकांनी तुळजाभवानी संस्थानला ३ कोटी ७० लाख ९१ हजार १५७ रुपये दान दिले आहेत. दान दिलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यांची मोजणी अद्याप बाकी आहे.
[read_also content=”बहुप्रतीक्षित फोर मोर शॉट्स प्लीज! वेबसीरिजचा तिसरा सीझन ‘या’ दिवशी होणार रिलीज https://www.navarashtra.com/movies/release-date-of-four-more-shots-please-web-seris-in-announce-d-nrsr-333462.html”]
शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळात भाविक विक्रमी संख्येने देवीच्या दर्शनासाठी आले. भाविकांनी तुळजाभवानीचे अभिषेक दर्शन, धर्मदर्शन देणगी दर्शन , मुख दर्शन कळस दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी तुळजाभवानी चरणी देणगीसह पुजा व अन्य रुपात तब्बल ३ कोटी ७० लाख ९१ हजार १५७ रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले.
दानाचा प्रकार आणि रक्कम
देणगी दर्शन – १,६७,९६,२००
सिंहासन पेटी – १,०५,३७,९७०
दानपेटी- ७२,६३,०३०
विश्वस्त निधी -१८,२१,३७५
मनीऑर्डर – २,४६,३३५
नारळ विक्री – २,४४,७००
धनादेश देणगी – ८७,४६९
युपीआय ऑनलाईन देणगी – ५१,०००
नगद – २२,११४
गोंधळ, लमाण, जावळ – १०,१६०
आराध फी- ४,९८३
पुस्तक विक्री – १,९२८
कल्लोळ स्वछता – १०५०
फोटो विक्री – ९५०
प्राणी विक्री – ६७०
भोगी – ६५०
चरण तिर्थ प्राप्ती – ४०८
स्टेट जीएसटी – ५९.७३
सेंट्रल जीएसटी – ५९.७३
असे एकूण ३ कोटी ७० लाख ९१ हजार १५७ रुपयांचं उत्पन्न शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजाभवानी मातेच्या मंदीर समितीला मिळालं आहे.तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक जण येत असतात. त्यामुळे या दानाचे आकडे दरवर्षी उच्चांक गाठत आहेत.