माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या उल्हास नदीवर पूल आहे.दहिवली मालेगाव येथे असलेला जुना पूल 40वर्षे पूर्वी बांधण्यात आलेला आहे. त्यावेळी बांधलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून महापुराचे पाणी वाहून जाते आणि त्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते.त्यामुळे उल्हास नदीवर नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षे सुरु आहे.त्यानुसार राज्य सरकारकडून नवीन पूल उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळावी आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या कडून या पुलाची मागणी गेली पाच वर्षे सरकारकडे होत होती.या पुलाची गरज असताना आणि दरवर्षी पावसाळ्यात हा पूल चार ते पाच वेळा पाण्याखाली जात असल्याने पुलाचे बांधकाम तकलादू बनले आहे.यावर्षी तर पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती.
2024 पासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून ठेकेदार कंपनीसाठी हा पूल बांधला जात आहे की वाहने आणि जनतेसाठी? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असताना देखील बांधकाम विभाग संबंधित कामाचा ठेका घेणारे ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याची तसदी घेत नाही. त्याचवेळी पुलाचे कामासाठी 18 महिन्यांचा कालावधी संपून गेला आहे. तरी देखील या पुलाचे अर्धे काम देखील पूर्ण झालेले नाही. पुलाचे बांधकाम मंदगतीने सुरू असून स्थित उल्हास नदीवरील या पुलाची झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे दहिवली मालेगाव पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर नियंत्रण नसल्याने मागील दोन वर्षापासून सुरू आहे. नवीन पुलाची उंची ही जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा किमान दहा फूट उंच बनविण्यात येत आहे. त्याचवेळी जुन्या पुलावरून पावसाळ्यात उल्हास नदीला महापूर आल्यानंतर किमान पाच फूट उंचीवरून पाणी वाहून जात असते. त्यावेळी भविष्यात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पुलाची उंची अधिक ठेवण्यात येत आहे. त्यात अनेक महिने रखडलेल्या या पुलाचे काम पुन्हा सुरू झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दहिवली मालेगाव पुलाचे काम जनतेसाठी सुरु आहे की, ठेकेदासाठी असा प्रश्न आम्हला पडला आहे. या पुलाचे बांधकाम सुरु होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.पुलाचे खांब देखील उभे करून घेण्यात बांधकाम खाते निष्प्रभ ठरले आहे, असं स्थानिक रिक्षाचालक श्रावण जाधव यांनी सांगितलं आहे.
Ans: उल्हास नदीवरील विद्यमान पूल सुमारे 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि तो कमी उंचीचा आहे. पावसाळ्यात दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. सुरक्षित वाहतुकीसाठी आणि महापुराचा धोका टाळण्यासाठी नवीन उंच पूल आवश्यक झाला.
Ans: कमी उंचीचा बांधकाम महापुरात वर्षातून 4–5 वेळा पाणी पुलावरून वाहतं अवजड वाहनांना बंदी घालण्याची वेळ बांधकाम जुने व कमकुवत झाल्यामुळे धोका वाढलेला
Ans: नवीन पूल हा जुन्या पुलापेक्षा सुमारे 10 फूट अधिक उंच बांधला जात आहे, जेणेकरून भविष्यात पावसाळ्यात नदीची पातळी वाढली तरी पूल सुरक्षित राहील.






