संग्रहित फोटो
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पोलिस पदकांची घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना विविध पदके जाहीर झाले. यापैकी 4 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर झाले. यातील 39 पोलीस पदके गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तर 5 पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर झाली आहेत.
हेदेखील वाचा : खारेपाट विकास संकल्प संघटनेचे ठिय्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती; सिंचनासाठी पाणी मिळावं केली होती मागणी
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर केले जातात. यावर्षी एकूण ९४२ ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून, देशभरातील एकूण १०१ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, ९५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि ७४६ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके जाहीर करण्यात आली.
राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
रविंदर कुमार, झिले सिंग सिंगल-अतिरिक्त महासंचालक, दत्तात्रय राजाराम कराले-पोलिस महानिरीक्षक, सुनिल बलिरामजी फुलारी-पोलिस महानिरीक्षक, रामचंद्र बाबु केंडे-पोलिस कमांडंट.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक
संजय भास्कर दराडे-महानिरीक्षक, वीरेंद्र मिश्रा-महानिरीक्षक, आरती प्रकाश सिंह-महानिरीक्षक, चंद्र किशोर रामजीलाल मिना-महानिरीक्षक, दीपक कृष्णाजी साकोरे-उपमहानिरीक्षक, पोलिस उपअधीक्षक सुनील तांबे.
चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक
नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत काम करणाऱ्या चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक आयुक्त धर्मपाल बनसोडे, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, तसेच सध्या पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे यांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा : Republic Day 2025: कसे बनले सैन्य संचलन प्रजासत्ताक दिनाची शान? पहिल्यांदा किती जवानांनी केला होता मार्च?