खारेपाट विकास संकल्प संघटनेचे ठिय्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती; सिंचनासाठी पाणी मिळावं केली होती मागणी
पेण /विजय मोकल :- खारेपाटाला सिंचनासाठी हेटवण्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने केलेले ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.पेण खारेपाट भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गेले 2 वर्ष आमरण उपोषण आंदोलनानंतर ७६७ कोटीची मंजूरी मिळाली. मात्र खारेपाटातील हेटवणे कालव्याचे काम अजून सुरू झाले नाही. सद्यस्थितीत सदर कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टेंडर उघडले. तीन महिने उलटूनही कालव्याच्या कामाला आदेश दिले गेले नाहीत. त्यामुळे सरकार आंदोलकांची दिशाभूल करीत असल्याची भावना उपोषण कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; द्राक्ष व्यापाऱ्यांसाठी आता…
कालव्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रांताधिकारी पेण यांच्या दालनासमोर होणारे लक्षवेधी सत्याग्रह ठिया आंदोलन डिसेंबरमध्ये स्थगित केलेले होते. हे आंदोलन स्थगित करतांना एक महिन्यात कार्यारंभ आदेश होवून काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एक महिना होवूनही कार्यारंभ आदेश न झाल्याने तहसिलदार पेण यांचे दालनासमोर सत्याग्रह ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले होते. हेटवणे विभाग प्रकल्प अधिकारी यांच्यावतीने कालव्याच्या कामाबाबत कार्यारंभाची प्रक्रिया उच्चस्तराव सुरू असल्याचे लेखी पत्र दिल्याने ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक, तब्बल 15 लाखांना घातला गंडा
पेण खारेपाट विकास संकल्प संघटना, 24 गाव संघर्ष समिती, गेल पाइपलाइन विरोधी संघर्ष समिती, MMRDA विरोधी भुमीपुत्र संघर्ष समिती व खारेपाटातील सर्व शेतकरी यांनी हे आंदोलन सुरु केले होते. सिडकोची पाइपलाइन 2002साली पूर्ण होते व पुन्हा जलबोगद्याच्या कामास सुद्धा मंजुरी मिळून काम सुरू होते होते परंतु कष्टकरी शेतकर्यांसाठी हेटवणे धरण बांधले आहे त्यांना मात्र अजूनही हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सरकार ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांत दुजा भाव करत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आहेत .कार्यारंभ आदेश होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने केला आहे.यावेळी कवी अशोक मढवी व लवेंद्र मोकल यांनी आंदोलनाबाबत गीत गाऊन चेतना निर्माण केली यावेळी अध्यक्ष- प्रकाश माळी, सचिव- सी आर म्हात्रे, राजेंद्र झेमसे, प्रितेश माळी, महेंद्र ठाकूर, नंदा म्हात्रे, अजित पाटील, हेमंत पाटिल, अभिमन्यू म्हात्रे, समीर म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, अशोक मढवी, लवेंद्र मोकल, चंद्रहास म्हात्रे तसेच खारेपाट ग्रामस्थ उपस्थित होते.