Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार, माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

एकीकडे महापालिका निवडणुका महायुतीत लढल्या जाणार असल्याचे म्हटले जात असले तरी ठाकरे गटाला मुंबई पालिकेच्या निवडणुकीतून हद्दपार करण्याचा चंग भाजपाने बांधलेला पाहायला मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 07, 2025 | 09:21 PM
अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार, माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश(फोटो सौजन्य- X)

अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार, माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश(फोटो सौजन्य- X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : एकीकडे मुंबईसह राज्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कंबर कसून तयारीला सुरुवात केली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे निम्मे माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. यात आता “एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं देखील आहे. पूर्वीचे स्थगिती सरकार होते तर महायुतीचे प्रगतीचे आणि समृद्धीचे सरकार आहे, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच ठाणे जिल्ह्यातील शहपूरमधील सुमारे ७०० कार्यकर्त्यांनी आज (७ जून) उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

पुण्यात कोसळधार! ‘या’ भागात जोरदार हजेरी, वाहतुकीवर मोठा परिणाम

या पक्षप्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे. मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी व ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळाले. आताही महायुतीची दुसरी इनिंग सुरु असून देवेंद्र फडणवीस आणि आमची टीम महाराष्ट्राला पुढे नेतेय. या राज्याचा विकास, प्रगती झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, या हेतूने सरकार काम करत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

माजी आमदार भानुदास मुरकुटे, नीरज मुरकुटे, संजय छल्लारे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत, भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी, महेंद्र टाटिया यांच्यासह श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शेकडो सहकारी, अनेक माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिप सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच शेकडो सामाजिक कार्यकर्ते, विदर्भ शिक्षक संघटनेचे डॉ. दिलीप सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे आणि प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात शहापूर तालुक्यातील उबाठा गटाच्या जवळपास ७०० कार्यकर्त्यांनी आज धनुष्यबाण हाती घेतला. तसेच लातूरमधील महिला भगिनींनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

तसेच धनुष्यबाण हाती घेणाऱ्या भानुदास मुरकुटे यांचा नातू नीरज मुरकुटे याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष कौतुक केले. नीरज मुरकुटे हा ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन आला आहे. त्याने शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. समाजाच्या दृष्टीने उच्चशिक्षित पिढी राजकारणात येणं, ही काळाजी गरज आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील नुकताच चार देशांचा दौरा करुन मायदेशी परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. श्रीकांत यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाचे यशस्वी नेतृत्व केलं आणि परदेशात ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका पटवून दिली. या चारही देशांनी भारताला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला विरोध केला. पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा करण्याचे काम या शिष्टमंडळाने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Thane News : शिवसेनेच्या प्रयत्नाला यश, टोइंगच्या जाचक अटीतून ठाणेकरांची मुक्तता

Web Title: 700 workers from shahapur have taken up the shivdhanush task

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • shivsena

संबंधित बातम्या

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
1

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
2

Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम
3

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर
4

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.