ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे: गेले काही दिवस ठाणेकरांना टोइंगच्या जाचाला सामोरे जात होते याचपार्श्वभूमीवर आता ठाणेकरांनी काही अंशी मुक्तता झाली आहे. ठाण्यातील काही नागरिकांच्या टोईंगबाबतच्या तक्रारी व मागणीनुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
प्रत्येक शाळेच्या आवारात शाळा भरताना व सुटताना टोइंग करू नये जेणेकरून पालकांना व विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होईल. कोणत्याही हॉस्पिटल बाहेर टोइंग केलेल्या गाड्या उचलताना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो म्हणूनच हॉस्पिटल बाहेरील बंद करण्यात यावे. तसेच मेडिकल असो किंवा कोणतेही पॅथॉलॉजीचे सेंटर असो या बाहेरील गाड्या सुद्धा टोइंग केल्या जाऊ नये.
एखादे वाहन जर नो पार्किंग मधून टोइंग साठी उचलण्यात आले तर त्याचे चलन फाडेपर्यंत जर वाहन मालक तिथे पोहोचला तर ते वाहन तसेच सोडण्यात यावे. नो पार्किंग मधील वाहन निष्काळजीपणे उचलून नेत असताना जर वाहनाची दुरावस्था झाली तर त्याची नुकसान भरपाई टोइंग मालकांनी करून द्यावी. ठाण्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक दुचाकी वाहनाचा वापर करणाऱ्या तसेच दिव्यांग व्यक्तींकरिता या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात यावी. टोइंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चुकीची वर्तणूक असो, कोणत्याही प्रकारची घोषणा न करता वाहन उचलणं.
किंवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून जर कारवाई होत नसेल तर कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन, टोइंग मालकांचा करार रद्द करावे. या सर्व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या वाहतूक पोलिस उपायुक्त शिरसाठ यांनी मान्य केल्या.या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, शहर सचिव बाळा गवस, संघटक रमाकांत पाटील, विभागप्रमुख किरण नाकती, दिपक म्हस्के, प्रशांत पाटील, संतोष बोडके,समन्वयक प्रकाश पायरे, प्रीतम राजपूत, विकास पाटील, शाखाप्रमुख वसंत कोंडभर, सचिन चांदगुडे, स्वप्नील लांडगे हजर होते.