पुण्यात मुसळधार पाऊस (फोटो - सुशील राठोड )
लांडेवाडी, भोसरी एमआयडीसी, शांतीनगर या भागांतही जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले. ज्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुणे शहरात शनिवारी ५०-७० मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे.
पुढील २४ तास पुण्यात व राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरात दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हिंजवडी IT पार्क बनले वॉटर पार्क
काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही वेळ झालेल्या पवसाने हिंजवडी आयटीपार्कची दाणादाण उडवली आहे.
आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कचे रूपांतर थेट वॉटर पार्कमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. केवळ 10 मिनिटांच्या वेळेत हिंजवडीचे रास्ते पूर्णपणे जलमय झाले.
Pune Rain News: हिंजवडी IT पार्क बनले वॉटर पार्क; काही क्षणाच्या पावसाने वाजवले तीनतेरा…
अनेक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले की काही दुचाकी वाहून गेल्या. रस्त्यावर पाणी सचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 10 मिनिटांच्या पावसाने उडालेली दाणादाण म्हणजे प्रशासनाच्या तयारीचे तीनतेरा वाजवले असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तासांत पाऊस घालणार थैमान
राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र गेल्या एक ते दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. दरम्यान मुंबईला पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.