Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली बस झाडावर आदळली; थरारक अपघाताचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद

पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 05, 2023 | 12:51 PM
पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली बस झाडावर आदळली; थरारक अपघाताचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेचं थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली रायझिंग स्टार या शाळेची ही बस होती. सोमवारी ४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र वाटेतच ही बस झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर मोठा आवाज झाला, त्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मुलांच्या मदतीसाठी धावले.

अचानक घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यी मोठमोठ्याने रडत होते. मात्र उपस्थित नागरिकांना त्यांना धीर देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. काही जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवानी कुणालाही गंभीर इजा झाली नाही.

बसची धडक इतकी जोरदार होती की समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: A bus full of students hit a tree in pune video of the thrilling accident caught on cctv nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2023 | 12:51 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune Accident
  • school bus

संबंधित बातम्या

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज
1

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
2

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
3

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण
4

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.