Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत असून, आता या प्रकल्पाला CRZ मंजुरी मिळाल्याने कामाला गती मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2026 | 08:16 AM
मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दररोज 200 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
  • या प्रकल्पामुळे मालाड, गोरेगाव, बोरिवली, दहिसर आणि कांदिवली परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.
  • सुमारे 3,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून भविष्यात मुंबईला एकूण 400 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे.
भविष्यात मुंबईची पाण्याची वाढती गरज लक्षात घेता मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा ४०० दशलक्ष लिटर क्षमतेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील २०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यास केंद्र सरकारच्या ‘सीआरझेड’ची मंजुरी अखेर मिळाली आहे. या मंजुरीमुळे मनोरी येथील निःक्षारीकरण प्रकल्पाला मोठी गती मिळणार आहे.

Railway Mega Block : रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट! लोकलने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

मालाड, गोरेगाव, बोरिवली, दहिसर आणि कांदिवली या भागांतील नागरिकांची पाण्याची समस्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान, पुढील आठ ते दहा दिवसांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मेरिटाईम बोर्डाचीही मंजुरी मिळणार असून, या वर्षांच्या पावसाळ्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

मुंबईची लोकसंख्या सध्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून भविष्यात हीच लोकसंख्या दोन कोटींच्या पार जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पालिकेने समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकला होता, मात्र अखेर ‘जीक्यूपीआर’ कंपनीची निवड करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांची मंजुरी मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू होते, ज्याला आता यश आले आहे.

दोन टप्यांत मिळणार मुंबईकरांना पाणी

या प्रकल्पावर साडेतीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पात समुद्रातून पाणी आणण्यासाठी आणि प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यासाठी दोन किमी लांबीचे दोन बोगदे बांधावे लागणार आहेत. पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी २०० दशलक्ष लिटर असे एकूण ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळेल.

Mumbai Pollution : विषारी वायूमुळे नागरिक त्रस्त; देवनार डम्पिंगवरून पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी

गारगाई धरण प्रकल्पाचीही तयारी

आधी या प्रकल्पासाठी ३ हजार ५२० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. वाढती गरज ओळखून मुंबई पालिकेकडून गारगाई धरण प्रकल्प राबविण्याचीही तयारी सुरू असून, त्याला स्थायी समिती व सभागृहाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. आता मनोरी प्रकल्पाला ‘सीआरझेड’ची मंजुरी मिळाल्याने मुंबईच्या पाणी पुरवठ्याला नवसंजीवनी मिळणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbais ambitious desalination project gets crz approval 400 million litres of water to benefit city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Mumbai News
  • NAVARASHTRA
  • Water Issue

संबंधित बातम्या

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल
1

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल

चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप
2

चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप

Mumbai News: सहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित! एफडीएच्या विशेष धडक मोहिमेत ३४.८७ लाखांचा गुटखा जप्त
3

Mumbai News: सहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित! एफडीएच्या विशेष धडक मोहिमेत ३४.८७ लाखांचा गुटखा जप्त

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
4

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.