Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! मराठी भाषेला अधिकृत अभिजात दर्जा, उदय सामंत यांच्या हाती आला शासनाचा आदेश

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 08, 2025 | 12:49 PM
मोठी बातमी! मराठी भाषेला अधिकृत अभिजात दर्जा (फोटो सौजन्य-X)

मोठी बातमी! मराठी भाषेला अधिकृत अभिजात दर्जा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा झाल्यानंतरही याबाबतचा शासन आदेश निघाला नव्हता. मात्र, आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना याबाबतचा आदेश सोपवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं महाराष्ट्राकडून स्वागत केलं जात आहे.

याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, ‘महाराष्ट्राचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. मी मराठीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचं काम करायचं आहे. आता मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी वाढली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचे आभारी मानतो.’

बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतीचा बसतोय फटका; हक्काचं घर राहतंय स्वप्नातच

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने फायदे

  • अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणाऱ्या अभ्यासकांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील.
  • सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना करता येणार
  • प्रत्येक अभिजात भाषा विद्यापीठात एक अभ्यास केंद्र स्थापन केले जाईल.
  • मराठी बोलीभाषेचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करता येणार आहे.
  • भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होणार
  • प्राचीन ग्रंथांचे भाषांतर करता येणार
  • महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सक्षम केले जाईल
पुरातनता, श्रेष्ठता, स्वाभिमान आणि सलगता म्हणजेच अभिजात भाषा. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचा अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहे. गृह मंत्रालयाने 2005 मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाला अधिकार दिले. हा दर्जासाठीचे 4 निकष आहेत. मराठी भाषा ते सर्व निकष पुर्ण करते हे रंगनाथ पठारे समितीच्या 436 पृष्ठांच्या अहवालात सिद्ध केलेले आहे.

अभिजात भाषेसाठी निकष

  • भाषेचा रेकॉर्ड केलेला इतिहास खूप प्राचीन आहे, म्हणजे ती 1500-2000 वर्षे जुनी आहे.
  • प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
  • दुसर्‍या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
  • अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

भारतातील कोणत्या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे?

तमिळ (2004)
संस्कृत (2005)
कन्नड (2008)
तेलुगु (2008)
मल्याळम (2013)
ओडिया (2014)
मराठी (2025)

“धनंजय मुंडे हे म्हणजे पुरुष वेश्या”; शरद पवार गटाच्या आमदाराची टीका करताना जीभ घसरली

Web Title: A government order has been issued to give classical status to marathi language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • india
  • narendra modi
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर
1

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला
2

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
3

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश
4

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.