निवडणुकीपूर्वी नगर विकास खात्याकडून ७५० कोटींचे मोठे निधी वाटप;
Eknath Shinde News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याने ७५० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या वाटप केल्याची माहिती समोर आली आहे. हा निधी दोन विशेष योजनांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या योजनांमुळे नगर विकास खात्याला पायाभूत सुविधा सुधारणा आणि विशेष प्रकल्पांसाठी निधी वाटपाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. तसेच, महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील प्रभागांना निधी वाटपाचे निर्णय घेण्याचा अधिकार नगर विकास खात्याच्या अंतर्गत राहणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याकडून केलेल्या निधी वाटपात बहुतांश निधी महायुतीच्या आमदारांना जाहीर करण्यात आला आहे. विशेषतः शिंदेसेनेच्या आमदारांना इतरांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या मतदारसंघांमध्ये येत्या काळात विविध कामकाज आणि विकास प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेसेनेला या भागांत फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Nashik Rainfall News: अतिवृष्टीने नाशिकमध्ये हाहा:कार; भुजबळ दौरा सोडून नाशिककडे रवाना
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने मोठ्या प्रमाणात निधी वाटप सुरु केले आहे. या निधीची रक्कम ३ लाखांपासून १० कोटी रुपयांपर्यंत आहे. याच्या माध्यमातून पदपथ बांधणी, सांडपाणी व्यवस्थापन, सभागृह, ग्रंथालय आणि व्यायामशाळांसारखी कामं मार्गी लावली जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लहान-मोठ्या कामांचा परिणाम महत्त्वाचा ठरतो. निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर होत असल्याने ही कामे पूर्ण झाली तर सत्ताधाऱ्यांना स्थानिक पातळीवर फायदा होण्याची शक्यता आहे.
काही भागांमध्ये महापालिका कार्यालयांच्या सुधारणा आणि हिंदू स्मशानभूमींच्या देखभालीसाठी जास्त निधी दिला गेला आहे. यापैकी सर्वाधिक निधी, म्हणजे ६१.५ कोटी रुपये, ठाण्याला देण्यात आला आहे. ठाण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्यामुळे हे लक्षवेधी आहे. तसेच साताऱ्यातील नगर परिषदा आणि परिषदांना देखील मोठा निधी देण्यात आला आहे, सातारा हे एकनाथ शिंदेंचे मूळ गाव असल्याने ही बाब विशेष महत्त्वाची ठरते.
IPO: एकाच दिवशी तीन IPO उघडणार, ग्लोटिस-फॅबटेक आणि ओम फ्रेटमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी
मुंबईतील शिवसेना आणि भाजपच्या काही आमदारांच्या मतदारसंघांनाही मोठा निधी मिळाला आहे. यात चेंबूर, घाटकोपर पूर्व, कुलाबा, चारकोप आणि बोरिवली मतदारसंघांचा समावेश आहे. या बहुसंख्य मतदारसंघांना प्रत्येकी सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे.
नगर विकास विभागाकडून केलेल्या निधी वाटपात बहुतांश निधी शिवसेनेच्या नेत्यांना मिळाल्याचे दिसते. त्याचबरोबर भाजपच्या काही आमदारांनाही चांगला निधी मिळाल्याचेही समोर आले आहे. एका वरिष्ठ भाजप नेत्याच्या मते, “आमदारांच्या मागण्या लक्षात घेऊन हा निधी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दिला जातो. निवडणुकीपूर्वी सुरु असलेल्या कामांमुळे अधिक मतदान खेचण्यास नक्कीच मदत होते.”
त्याचबरोबर, आधीच्या सरकारच्या काळात आणि शिंदे मुख्यमंत्री असताना नगर विकास खात्याकडून शिवसेना आमदारांना भाजपच्या आमदारांपेक्षा जास्त निधी मिळत असल्याची बाबही या नेत्यानं लक्षात आणून दिली.