Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar News: दुष्काळाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल: नदीजोड प्रकल्पांमुळे मराठवाड्याचा कायापालट

या नदीजोड प्रकल्पांचा सर्वांत मोठा फायदा हा की, कोकणातील अतिवृष्टीचे पाणी वाया जाण्याऐवजी मराठवाड्‌यातील दुष्काळग्रस्त भागात पोहोचेल. यामुळे एकीकडे कोकणात पूराची तीव्रता कमी होईल

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 23, 2026 | 03:19 PM
River Linking Projects,Drought-free Marathwada,

River Linking Projects,Drought-free Marathwada,

Follow Us
Close
Follow Us:
  • मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वांत दुष्काळग्रस्त भाग
  • नदीजोड प्रकल्प हे मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी क्रांतिकारी ठरणार
  • कोकणातील अतिवृष्टीचे पाणी दुष्काळग्रस्त भागात
Chhatrapati Sambhajinagar:  मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वांत दुष्काळग्रस्त भाग. दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी आत्महत्या, पाणीटंचाई आणि स्थलांतराची समस्या भेडसावते. मात्र आता या भागाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘नदीजोड’ प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्यासोबत झालेल्या विशेष बैठकीत राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी दुष्काळमुक्त मराठवाड्‌यासाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य देण्याची जोरदार मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने हाती घेतलेले नदीजोड प्रकल्प हे मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहेत. कोकणातील पूरप्रवण नांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. दामगंगा-वैतरणा-गोदावरी, दामगंगा-गोदावरी, पार-गोदावरी अशा महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांमुळे मराठवाड्यात ५० टीएमसीपेक्षा अधिक पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.

Municipal Election 2026: महाराष्ट्रातील महापौर निवडणुकीचा ‘फॉर्म्युला’ काय? कसा असतो नगरसेवकांचा कार्यकाळ

कोकणातील अतिवृष्टीचे पाणी दुष्काळग्रस्त भागात

या नदीजोड प्रकल्पांचा सर्वांत मोठा फायदा हा की, कोकणातील अतिवृष्टीचे पाणी वाया जाण्याऐवजी मराठवाड्‌यातील दुष्काळग्रस्त भागात पोहोचेल. यामुळे एकीकडे कोकणात पूराची तीव्रता कमी होईल, तर दुसरीकडे मराठवाड्यात शेतीला वर्षभर पाणी मिळेल, पर्यावरणतज्ज्ञ सांगतात की, योग्य नियोजनाने हे जलवळण जैवविविधतेचे संरक्षण करेल आणि जलचक्र संतुलित राहील. याशिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होऊन ग्रामीण भागातील महिलांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मराठवाड्यातील शेतकरी संघटना या विकासाचे स्वागत करताना म्हणतात की, हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास पुढच्या पिढीला दुष्काळाची साखळी तोडता येईल.

… तर पाण्याचे समन्यायी वितरण शक्य

केंद्र सरकारने या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रकल्पांच्या जलसंपदा अभ्यासानुसार लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडसारख्या योजनांमुळे पाण्याचे समन्यायी वितरण शक्य होईल आणि शेतकऱ्यांच्या यशस्वी झाल्यास मराठवाडा हिरवागार होईल आणि शेतकरी समृद्ध होईल. मराठवाड्यातील जनतेसाठी ही बाब आशादायक आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने आत्महत्या थांबतील. हा प्रकल्प दुष्काळाच्या सावटातून मुक्ती मिळण्याची वाट मोकळी झाली आहे.

नगरसेविका Sahar Sheikh यांच्या वादग्रस्त विधानावर नवनीत राणांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या-

मराठवाड्यातील दुष्काळ ही केवळ हंगामी नव्हे, तर दीर्घकालीन समस्या असून ती कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नदीजोड प्रकल्पांशिवाय पर्याय नाही, त्यामुळे या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम व स्पष्ट मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री

६४ हजार हेक्टरला फायदा

बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांनी केंद्राकडे या प्रकल्पांसाठी विशेष निधीची मागणी केली. राज्यातील २९ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रकल्पांचा आढावा घेताना गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पांना प्राधान्य देण्यात यावे, असे सांगण्यात आले. याशिवाय निळवंडे धरण फेज-२ साठी सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, अशी विनंती करण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अहमदनगर आणि मराठवाड्याच्या सीमेवरच्या भागात ६४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल.

 

 

Web Title: A major step by the state government to break the cycle of drought river interlinking projects will transform marathwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • irrigation projects
  • Marathwada
  • state government

संबंधित बातम्या

Road Accidents: मराठवाड्यात रस्ते अपघातांचा हाहाकार! बीड आणि हिंगोलीत मृत्यूचा दर सर्वाधिक; काय आहे प्रमुख कारण?
1

Road Accidents: मराठवाड्यात रस्ते अपघातांचा हाहाकार! बीड आणि हिंगोलीत मृत्यूचा दर सर्वाधिक; काय आहे प्रमुख कारण?

मराठवाड्यात ‘वंदे भारत’ स्लीपर डब्यांची कारबॉडी निर्मिती; ‘हे’ शहर ठरणार महत्त्वाचे राष्ट्रीय निर्मिती केंद्र
2

मराठवाड्यात ‘वंदे भारत’ स्लीपर डब्यांची कारबॉडी निर्मिती; ‘हे’ शहर ठरणार महत्त्वाचे राष्ट्रीय निर्मिती केंद्र

Kannada Outram Ghat Tunnel: ४५ मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत! मराठवाडा-खान्देश कनेक्टिव्हिटीसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय
3

Kannada Outram Ghat Tunnel: ४५ मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत! मराठवाडा-खान्देश कनेक्टिव्हिटीसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Industrial Crisis Marathwada: मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट! ६०२ उद्योग बंद झाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर
4

Industrial Crisis Marathwada: मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट! ६०२ उद्योग बंद झाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.