मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी कारागृहात लिहिलेलं ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात खासदार आणि ज्येष्ठ संपादक संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित एक खळबळजनक दावा केला आहे. “बाळासाहेब ठाकरे यांनी एका प्रसंगातून तत्कालीन मंत्री अमित शाह यांना वाचवलं होतं. असा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे.
शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना संकटाच्या काळात कशी मदत केली, याबाबत सविस्तर खुलासा करण्यात आला आहे. त्याकाळी संपूर्ण देश नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होता. मात्र शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि ‘सामना’ या माध्यमातून मोदींच्या पाठीशी उभे राहिले. याविरोधात, राऊतांच्या म्हणण्यानुसार, नंतर मोदींनीच शिवसेनेला असुरी पद्धतीने फोडले.
गुजरातमधील दंगलीनंतर अमित शाह मोठ्या अडचणीत सापडले होते. केंद्रात यूपीए सरकार होते आणि काही गंभीर गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे होता. नरेंद्र मोदी त्यावेळी काही करू शकत नव्हते, कारण अमित शाह यांना गुजरातमधून तडीपार करण्यात आले होते. त्यांचा जामीनही संकटात होता. अशा परिस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकच व्यक्ती त्यांना मदत करू शकतात, असे त्याना सुचवण्यात आले. त्यानंतर अमित शाह आपल्या मुलगा जय शाहसह मुंबईत पोहोचले आणि विमानतळावरून काळी-पिवळी टॅक्सी पकडून थेट मातोश्रीवर दाखल झाले. असही पुस्तकात असं नमूद करण्यात आलं आहे.
मात्र त्या वेळी मातोश्री परिसरात कडक सुरक्षा होती. कलानगरच्या मुख्य गेटवरच त्यांना थांबवण्यात आले. अमित शाहांनी तिथे बराच काळ घामाघूम अवस्थेत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिक्षा केली. पण त्यादिवशी त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे आणि अमित शाहांची भेट झाली.
‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित एक अत्यंत भावनिक आणि नाट्यमय प्रसंग उलगडला आहे. गुजरात दंगलीनंतर हिंदुत्वासाठी काम केल्याची “शिक्षा” आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावी लागत असल्याची व्यथा अमित शाह यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मांडली होती. “मी अडचणीत आहे… अमुकतमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे, तडीपारी आहे…” अशा शब्दांत अमित शाहांनी त्यांच्या वेदना मांडल्या. त्यानंतर “आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे… तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत.” अशी विनंतीही त्यांनी बाळासाहेबांकडे केली.
Diamond League : ऑलिंपिक पदक विजेत्या Neeraj Chopra चा लागणार कस, आजपासून मोहिमेची सुरुवात
यावर बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून तत्काळ त्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला संपर्क साधला. बोलताना त्यांनी सांगितले, “तुम्ही कोणत्याही पदावर असाल, पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका…” आणि तो एक फोन अमित शाह यांच्या राजकीय आयुष्यातील अनेक अडचणी दूर करणारा ठरला. या घटनेनंतर अमित शाहांची राजकीय वाटचाल उंचावली. पण पुढे त्यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांना जी वागणूक दिली, ती ‘निर्घृण’ होती, अशी तीव्र भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. या सगळ्या घटना संजय राऊत यांनी ईडी कोठडी संपून न्यायालयीन कोठडीत म्हणजेच आर्थर रोड कारागृहात असताना त्याचा वेध ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात घेतला आहे.