Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंडी व फळांसाठी निधी द्यावा, नाहीतर…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सरकारला इशारा

शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा एक अंडे दिले जाते, त्यासाठी किती निधी लागणार आहे? तेवढेही पैसे सरकार नाहीत का असा सवाल काँग्रेसने केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 30, 2025 | 04:06 PM
अंडी व फळांसाठी निधी द्यावा, नाहीतर...; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सरकारला इशारा

अंडी व फळांसाठी निधी द्यावा, नाहीतर...; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सरकारला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत, असा जीआर काढला आहे. सरकारचा हा निर्णय सरकारी शाळांमध्ये जाणाऱ्या सर्वसामान्य गरिब घरातील मुलांवर अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द करून निधी पूर्वीप्रमाणेच द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार अजब गजब निर्णय घेणारे सरकार आहे. शालेय मुलांच्या मध्यान्न भोजन योजनेतील अंडी, दूध व फळांसाठी सरकारक़डे पैसे नसतील तर सरकारची आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली आहे किंवा सर्वसामान्य गरीब घरांतील मुलांना पौष्टीक आहार मिळू नये असा त्याचा अर्थ आहे. गरिबांना महिन्याला ५ किलो मोफत धान्य व १५०० रुपये दिले म्हणजे हा घटक गप्प बसेल व सरकारला प्रश्न विचारणार नाही यासाठी हे षडयंत्र असावे. परंतु सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा एक अंडे दिले जाते, त्यासाठी किती निधी लागणार आहे? तेवढेही पैसे सरकार नाहीत असे नाही. स्वतःची जाहिरातबाजी करण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते पण गरिबांना काही द्यायचे असेल तर निधी नसतो कसा? असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

जाणून घेऊया अंडे खाण्याचे फायदे

  • पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात.
  • तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अंड्याचं सेवन करू शकता.
  • अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात जे दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतात. अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
  • अंड्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असल्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
  • अंडी खाल्ल्याने डोळ्यांनाही फायदा होतो. यामध्ये असलेले पोषक घटक मॅक्युलर डिजेनेरेशनची समस्या टाळण्यास मदत करतात.
  • अ जीवनसत्वाचे प्रमाण डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात. अंडी मेंदूसाठी खूप फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे.
  • अंड्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन बी 12 असते ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

Web Title: A senior congress leader has warned the government about the diet of school children nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • cmomaharashtra
  • Congress
  • devendra fadanvis
  • Maharashtra school

संबंधित बातम्या

Abu Azmi : “काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
1

Abu Azmi : “काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र
2

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र

Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा
3

Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
4

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.