Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गद्दार सरकारचे आत्ता काही खपवून घेतले जाणार नाही; अजित पवार यांचा इशारा

सत्तेतील मंत्री प्रवक्ते रोजच बेताल वक्तव्य करीत आहेत. तर राज्यपालही राष्ट्रपुरुषांचा अपमान करीत आहेत. कायदा सुव्यवस्थेची ऐसे तैसे करणाऱ्या या गद्दार सरकारचे आत्ता काही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2022 | 02:12 PM
गद्दार सरकारचे आत्ता काही खपवून घेतले जाणार नाही; अजित पवार यांचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

श्रीगोंदा : राज्यातील सरकार हे धूळ फेक करून रेडे कापणे ज्योतिषी गंडा दोरी अंधश्रद्धा वाढवत आहे. यांना जबाबदारीचे भान नाही. यांना सत्तेची नशा, मस्ती, धुंदी चढली आहे. सत्तेतील मंत्री प्रवक्ते रोजच बेताल वक्तव्य करीत आहेत. तर राज्यपालही राष्ट्रपुरुषांचा अपमान करीत आहेत. कायदा सुव्यवस्थेची ऐसे तैसे करणाऱ्या या गद्दार सरकारचे आत्ता काही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे.

शनिवार दिनांक १० डिसेंबर रोजी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना पिंपळगाव पिसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार बोलत होते.

पवार म्हणाले, राज्यात शेतकऱ्याच्या खरिपाचे पिके वाया गेली तर रब्बी पिकातही अडचणी आल्या असून, त्यातच भर म्हणुन खाते, औषधे, बी- बीयाने डिझेल, पेट्रोल, गॅस, जीवनावश्यक वस्तू महागाईने शेतकरी व सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. त्यातच कोरोना नंतर गोवर, जनावरांना लंपी आजाराने गोवसले आहे. शेतकऱ्यांचा पिक विमा भरून घेतला परंतु नुकसान झाल्यानंतर भरपाई देणे ऐवजी विमा कंपन्या ऑफिस बंद करून गायब झाले आहेत. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तोंडी सांगतात विज बिल भरू नका मात्र लेखी आदेश काढत नाहीत. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करत आहेत. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अशी सध्या परिस्थिती आहे.

राज्यात सहा महिन्यापूर्वी शिंदे फडवणीस सरकार आले. चाळीस दिवस दोघेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. कॅबिनेट बैठकही दोघेच घेत होते. चाळीस दिवसानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार केला. तेही बिनकामाचे मंत्री केले. सरकार हे राज्याचे असते ते कोणत्याही पक्षाचे नसते. जी कामे पूर्वीचे मंजूर आहेत ते पूर्ण करायचे असतात. मुंबई -पुणे स्व बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचे सरकार असताना मंजूर केला होता. तो सरकार गेल्यानंतर आम्ही पूर्ण केला. तर समृद्धी महामार्ग आघाडी आम्ही आल्यानंतर आम्ही त्याला निधी दिला परंतु हे सरकार पूर्वीचे काम बंद करून नवीन निर्णय घेतात व सरकार विरोधात बोलेल त्याला ईडी बीडीची भीती दाखवून कारण नसतानाही जेलमध्ये टाकतात. असे या सरकारला वठणीवर आणण्यासाठी येत्या १७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

बबनराव पाचपुते सध्या आजारपणाचे सोंग घेतायेत

राहुल जगताप म्हणाले, भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी चाळीस वर्षे सत्ता उपभोगली ते सध्या आजारपणाचे सोंग घेत आहेत. पक्षाच्या कार्यक्रमात भाषण बाजी करतात मात्र विकास कामांच्या बाबतीत ब्रश शब्दही काढत नाहीत. स्व. शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप हे आजारी असताना त्यांची टिंगल टवाळी करत होते. मग आत्ता तालुक्याची रस्ते वीज पाणी याबाबत काहीच का बोलत नाहीत तसेच तालुक्यातील अनेकांची घरे फोडली मात्र हे इथेच खेळावे लागते अशी म्हण आहे त्याप्रमाणे त्यांचे घरही आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात चुलत भाऊ उभे राहून त्यांचेही घर फुटले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी प्रस्तावित केले तर या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार,राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती व पणन मंडळाचे संचालक बाळासाहेब नहाटा, कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती राहुल जगताप, कुकडीचे उपाध्यक्ष विवेक पवार, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, सेवा संस्थेचे चेअरमन विजय कुलथे, युवा नेते शरद नवले, मेजर बापूराव निंभोरे, विश्वास थोरात, संभाजी देवीकर, ऋषिकेश गायकवाड, अमोल देशमुख, कल्याणी लोखंडे,सरपंच मीना सकट आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वबळाची भाषा करू नका

येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, विधानसभा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र बसुनच निर्णय घेणार मागील विधानसभेला घनश्याम शेलार हे अवघ्या २४०० मतांनी पराभूत झाले. स्वबळाची भाषा करू नका अवकात असेल तर लढा पण हारल्यानंतर गाठ आहे, यामुळे डोक शांत ठेवूनच येणाऱ्या निवडणुका लढा असे अजित पवार यांनी सांगितले.

Web Title: A traitorous government will not be tolerated now ajit pawars warning nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2022 | 02:12 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Shrigonda

संबंधित बातम्या

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ
1

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
2

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
3

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
4

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.