Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेणमधील राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरु

रावे पेण येथील राजकीय पक्षाचा युवा नेता योगेश बालकृष्ण पाटील याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मैत्रिच रुपांतर प्रेमात झाले. यावेळी आरोपीने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. पिडितेने ३० ऑगस्ट रोजी आरोपी योगेश पाटील विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 02, 2024 | 12:40 PM
पेणमधील राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरु

पेणमधील राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरु

Follow Us
Follow Us:

रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यातील अधिकारी आणि रावे पेण येथील राजकीय पक्षाचा युवा नेता योगेश बालकृष्ण पाटील (वय ३१ वर्षे) याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बालकृष्ण पाटील याच्यावर एका 30 वर्षीय तरूणीला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी योगेश बालकृष्ण पाटील याला अटक केली असून त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

हेदेखील वाचा- मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तिनं हाती घेतलं बसचं स्टीयरिंग; रस्त्यावर गोंधळ, 9 जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बाळकृष्ण पाटील हा पेणमधील रावे येथील रहिवासी आहे. तो रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी आहे. त्याची पेण येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणी सोबत २०१८ साली फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रित झालं आणि त्यानंतर ते दोघं वारंवार एकमेकांना भेटत होते. आणि भटीचे रूपांतर अखेर प्रेमात झाले. यावेळी आरोपीने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. पिडितेने एप्रिल २०२१ साली जेव्हा योगेश बालकृष्ण पाटील याला लग्नासाठी विचारणा केली असता त्याने नकार दिला.

या संपूर्ण घटनेनंतर एप्रिल २०२२ साली पिडितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पिडितेने योगेश याच्यासोबत बोलणं देखील बंद केलं होतं. मात्र तरी देखील योगेशने तिला पुन्हा संपर्क करण्यास सुरवात केली आणि पुन्हा लग्नाचं खोटं आश्वासन दिलं. ३० ऑगस्ट रोजी पीडित तरुणी वाशी येथील व्हि.एल.सी.सी इन्सिटीट्युट येथे गेली असता आरोपी योगेश पाटीलंने या तरुणीला वाशी रेल्वे स्टेशन येथे बोलावलं. त्यानंतर योगेशने पिडीतेला शिविगाळ आणि मारहाण केली आणि तिला वाशी येथे सोडून निघुन गेला. पिडितेने ३० ऑगस्ट रोजी आरोपी योगेश पाटील विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेदेखील वाचा- रेल्वेत वृद्धासोबत झालेल्या गैरवर्तनाचे सत्य समोर; 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आरोपी योगेश पाटील याच्यावर भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ६९, ३५१ (२), ३५२ या कलमांअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपील न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस करत आहेत.

याप्रकरणी महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा व पैशाचा माज आला आहे. यामुळेच त्यांची हिंमत महिलांवर अत्याचार करण्याची झाली आहे, अशा या असुरी वृत्तीला ठेचून काढण्याकरिता शासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच राज्यात दररोज मुली व महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्यांची असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे.

Web Title: A youth leader of the political party in pen booked for assault police started the investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • crime news
  • pen
  • pen news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.