File Photo : Arrest
नुकतीच नाशिमध्ये एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये ट्रेनमधील प्रवाशांनी एका वृध्दाला मारहाण केली होती. त्या वृध्दाच्या बॅगेत गोमांस असल्याच्या संशयावरून प्रवाशांनी वृध्दाला माराहाण केली होती. याप्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण घटनेबाबत ठाणे मध्य रेल्वेचे उपायुक्त मनोज नाना पाटील यांनी माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- कोल्ड कॉफीमध्ये आढळलं झुरळ, मालाडच्या प्रतिष्ठित हॉटेलमधील घटना; हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल
ठाणे मध्य रेल्वेचे उपायुक्त मनोज नाना पाटील यांनी सांगितलं की, नाशिक येथे एका एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका वृध्द व्यक्तिला मारहाण केल्याची घटना घडली होती. वृध्दाच्या सामानात गोमांस असल्याच्या संशय प्रवाशांना आला. याच संशयावरून प्रवाशांनी वृध्दाचं काहीही न ऐकता त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी 4 ते 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. धुळे एक्स्प्रेस ट्रेनमधील एका सीटवरून हे प्रकरण सुरू झाले. घटनेनंतर वृध्दाने रेल्वे पोलिसांकडे लेखी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली असून ते धुळे येथील रहिवासी आहेत. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 189(2), 191(2), 190, 126(2), 115(2), 324(4)(5), 351(2) अन्वये, कलम ३५२ अन्वये ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओ तपासून याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.
हेदेखील वाचा- दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट; नवी मुंबईतील युट्युबर विरोधात गुन्हा दाखल
कल्याण येथील पीडित 72 वर्षीय अश्रफ अली सय्यद हे 28 ऑगस्ट रोजी धुळे एक्स्प्रेसने मालेगाव येथे त्यांच्या मुलीच्या घरी जात होते. या प्रवासात त्यांच्यासोबत काही सामान देखील होतं. त्यांच्या सामानात गोमांस असल्याचा संशय ट्रेनमधील प्रवाशांना आला होता. यानंतर प्रवाशांनी अश्रफ अली सय्यद यांच्या सामानाची झडती घेतली आणि त्यांची चौकशी सुरू केली.
यादरम्यान आरोपींनी अश्रफ अली सय्यद यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीआरपीने या वृद्धाचा शोध घेतला आणि तक्रार देण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला. यानंतर ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी फिर्यादीच्या मुलीच्या घरी जाऊन तक्रारदाराचा जबाब नोंदवला.
या घटनेच्या संदर्भात ठाणे जीआरपीने धावत्या ट्रेनमध्ये एका वृद्ध प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी 4 ते 5 प्रवाशांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 189(2), 191(2), 190, 126(2), 115(2), 324(4)(5), 351(2) अन्वये, ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात भादंवि (3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओ तपासून आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.