Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जय भीमच्या घोषणा देणे, आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालणे हि अराजकता आहे का? फडणवीसांच्या टीकेवर CJP च्या अभिजित दीपकेंचा पलटवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉकरोच जनता पार्टी आंदोलनावर टीका करत आंदोलकांना "अराजकतावादी' म्हंटले होते. यावरूनच आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली. "जय भीमच्या घोषणा देणे, आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालणे हि अराजकता आहे का?" असा सवाल त्यांनी यावेळी उ

  • By विवेक
Updated On: Jun 07, 2026 | 09:01 PM
फडणवीसांच्या टीकेवर CJP च्या अभिजित दीपकेंचा पलटवार

फडणवीसांच्या टीकेवर CJP च्या अभिजित दीपकेंचा पलटवार

Follow Us
Follow Us:

काल (शनिवार, ६ जून) दिल्लीतील जंतर मंतर येथे पार पडलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (Cockroach Janta Party) जंतरमंतरवरील आंदोलनाला (Protest) आता सर्वच स्तरावरून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे दिसले. राजकीय स्तरावरही अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. अश्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या आंदोलनावर टीका करत आंदोलकांना “अराजकतावादी’ म्हंटले होते. यावरूनच आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली. “जय भीमच्या घोषणा देणे, आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालणे हि अराजकता आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

काय म्हणाले अभिजित दिपके?

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘अराजकतावादी’ टीकेला प्रत्युत्तर देत अभिजित दिपके म्हणाले, “मी आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो होतो, जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात, जय भीमच्या घोषणा अराजकता आहे का? फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा विचार करावं ते युपीचे मुख्यमंत्री नाहीत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. जो महाराष्ट्र सुधारणावादी आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे,” असे ते म्हणाले.

फक्त भाजपवालेच भारतीय आहेत का?

पुढे ते म्हणाले, “गेल्या १०-१२ वर्षांपासून जे हिंदू-मुस्लिम राजकारण सुरु आहे त्यातून कोणाला नोकरी मिळत नाही किंवा कोणाची परीक्षा चांगली होत नाही. त्यामुळे सरकारला आपला फोकस आणि प्राधान्यक्रम बदलावा लागेल. मला तुम्ही पाकिस्तानी म्हणता, तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता मग भारतीय कोण आहे? फक्त भाजपवाले आणि आयटी सेलवालेच भारतीय आहेत का?” असा सवाल त्यांनी केला.

गांधी-आंबेडकर-नेहरू-भगतसिंग हे आमची प्रेरणा – अभिजित दिपके

ते पुढे म्हणाले, “आमची प्रेरणा महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंग आहेत. विचारधारा कोणत्या एका पक्षाची नाही. फक्त पाच वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नाही. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला पाचहि वर्ष ज्यांना मत दिलं त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं. त्यांनी राजकारणाला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवले आहे, पण आम्ही ‘मुद्द्याचं राजकारण’ करत आहोत” असे ते म्हणाले.

Abhijit Dipke Warning: ‘आम्हा ‘कॉकरोचोंना’ सरकारची…’, जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर अभिजित दीपके यांचा शिक्षणमंत्र्यांना अल्टिमेटम

काय म्हणाले होते फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आपण सर्वानीच पाहिलं, जंतर मंतरला बघितलं कि ज्याप्रकारे तिथे नारेबाजी झाली, भाषणे झाली, व्यक्तव्ये झाली त्यातून एक गोष्ट लक्षात आली कि भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाही तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या. त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “संविधान केवळ पुस्तक नाही, त्यातील प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत. ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटत कि, आज अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतेचा चेहरा आणि मनसुबे उघडे झाले आहेत, त्यांना कुठलंही समर्थन मिळालेलं नाही,” अश्या शब्दांत त्यांनी या आंदोलनावर टीका केली.

‘ही युवांची अभिव्यक्ती नाही तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती,’ सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

Web Title: Abhijit dipke reacts on cm fadnavis comments over cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.