सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (Cockroach Janta Party) जंतरमंतरवरील आंदोलनाला (Protest) आता सर्वच स्तरावरून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) सदस्यांनी आज शनिवारी (6 जून 2026) जंतर मंतर येथे आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत संवैधानिक पद्धतीने आंदोलन पार पाडले. या आंदोलनाला विविध राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आज आपण सर्वानीच पाहिलं, जंतर मंतर ला बघितलं कि ज्याप्रकारे तिथे नारेबाजी झाली, भाषणे झाली, व्यक्तव्ये झाली त्यातून एक गोष्ट लक्षात आली कि भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाही तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या. त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “संविधान केवळ पुस्तक नाही, त्यातील प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत. ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटत कि, आज अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतेचा चेहरा आणि मनसुबे उघडे झाले आहेत, त्यांना कुठलंही समर्थन मिळालेलं नाही,” अश्या शब्दांत त्यांनी या आंदोलनावर टीका केली आहे.
एकीकडे दिल्लीत सीजेपी’च्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय मात्र चांगलेच चिंतेत होते. त्यातच अभिजीत दिपकेंनी कॉकरोच जनता पार्टीची चळवळ सुरु केल्यापासून त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या वाळूज येथील त्यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अभिजीत दिपके हे आज सकाळी अमेरिकेतून दिल्लीमध्ये दाखल झाले. एकीकडे जंतरमंतर मैदानात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा पोलीस प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
‘कोक्रोच ना कमी लेखू नका, सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल,’ उद्धव ठाकरेंचा कॉक्रोचेसना पाठिंबा






