Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“रस्त्यावर नमाज पडणे हा शौक नाही, तर…”, नमाजच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला

कोलकाता येथील सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर नमाज पठण करण्यास घालण्यात आलेली बंदी आणि त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर केलेल्या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 18, 2026 | 07:01 PM
कोलकात्याच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला (Photo Credit- X)

कोलकात्याच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “रस्त्यावर नमाज पडणे हा शौक नाही, तर…”
  • कोलकात्याच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला
Abu Azmi Namaz Controversy: कोलकाता येथील सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर नमाज पठण करण्यास घालण्यात आलेली बंदी आणि त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर केलेल्या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हा निर्णय कोणत्याही व्यवस्था सुधारण्यासाठी नसून, एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना कोपऱ्यात ढकलण्यासाठी घेण्यात आला आहे,” असा घणाघाती आरोप आझमी यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

“रस्त्यावर नमाज पठण करणे हा शौक नाही, तर मजबुरी” अबू आझमी यांनी मुस्लिम समुदायाला प्रत्येक लहान-मोठ्या मुद्द्यावरून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची खंत व्यक्त केली. रस्त्यावरील नमाज पठणाचे समर्थन करताना त्यांनी तांत्रिक बाजू मांडली. आझमी म्हणाले, “जेव्हा मशिदींमध्ये जागा अपुरी पडते आणि भाविकांची गर्दी वाढते, तेव्हा लोक नाईलाजास्तव काही काळासाठी बाहेर नमाज पडतात. जगभरात हे चित्र पाहायला मिळते. हा कोणाचा शौक नाही, तर जागेच्या तीव्र टंचाईमुळे निर्माण झालेली मजबुरी आहे.” नमाज केवळ काही मिनिटांची असते, मात्र काही लोक याकडे फार मोठा अडथळा असल्यासारखे पाहत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

भाजप आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणावर थेट प्रहार आपल्या वक्तव्यात आझमी यांनी केवळ एका राज्याचा उल्लेख न करता संपूर्ण देशातील राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. भारतीय जनता पक्ष (BJP) शासित राज्यांमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Mumbai: “कलिंगडमध्ये विष होतं का?”; एकाच कुटुंबाच्या मृत्यूनंतर अबु आझमींचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मोठा मागणी

“आज संपूर्ण देशात एका विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीनुसार मशिदींच्या बाहेर इबादत करण्यास बंदी घातली जात आहे. हा थेट मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचा प्रयत्न आहे,” असे आझमी म्हणाले. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे विविध समुदायांमध्ये दरी निर्माण होते.

राजकीय वर्तुळात वादाला तोंड; सोशल मीडियावर चर्चा रंगली अबू आझमी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटले आहे. एका बाजूने सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला, आझमी यांच्या समर्थकांनी याला धार्मिक भेदभाव मानले आहे. “भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने बंदी घालण्याऐवजी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहिजे,” असे सांगत आझमी यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

Abu Azmi: “महाराष्ट्रात मुस्लिमांना रस्त्यावरून चालणेही कठीण”; आमदार अबू आझमींच्या वक्तव्याने वातावरण तापले

Web Title: Abu azmi launches scathing attack on bjp over namaz decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
1

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल
2

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ
3

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
4

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.