अमरावती : न्यायालयातून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (District Central Jail) नेत असताना आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले. ही घटना जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरजवळ १३ ऑगस्ट रोजी घडली. गजानन अरुण आत्राम (४०, रा. अशोकनगर) असे आरोपीचे नाव आहे.
गजानन आत्रामविरुध्द गाडगेनगर पोलीस ठाण्यात (Gadgenagar Police Station) विनयभंग व मारहाण करणे (Molesting and beating) केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात गाडगेनगर ठाण्यातील एएसआय सुनिल अवसरमोल यांच्या पथकाने आरोपीला १३ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीचा जेल वॉरंट (Jail warrant of the accused) दिला. त्यामुळे पोलीस आरोपी आत्रामला घेऊन जिल्हा कारागृहात दाखल करण्यासाठी निघाले. दरम्यानच कारागृहातील आरोपींची रिलिफची वेळ असल्यामुळे एएसआय अवसरमोल यांना थोडा वेळ थांबावे लागले. दरम्यान, आरोपी आत्रामला लघुशंका लागली. त्यामुळे, पोलिसांना त्याला सागवान लागवडीतील मोकळ्या जागेत नेले.
दरम्यान, पोलीस हवालदार संजय सगणे यांच्या हाताला झटका मारून आरोपी आत्राम तारेच्या कंम्पाऊन्डमधून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. परंतु, तो हाती लागला नाही. या घटनेची तक्रार एएसआय सुनिल अवसरमोल यांनी १३ ऑगस्ट रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात (Fraserpura Police Station) नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी गजानन आत्रामविरुद्द कलम २२४ अन्वये गुन्हा नोंदविला.