Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या स्वच्छतेसाठी ‘वॉर्ड’ स्तरावर ॲक्शन प्लान! राडारोडा पसरवणाऱ्यांवर महानगरपालिकेची नजर, आराखडा तयार करण्याचे आदेश

'स्वच्छ सर्वेक्षण-२०२६' आणि 'मुंबई क्लीन लीग'च्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील स्वच्छता कामांचा आढावा घेण्यासाठी 'एम पश्चिम' आणि 'एच पश्चिम' विभाग कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.

  • By सुरुची कदम
Updated On: May 02, 2026 | 12:20 PM
मुंबईच्या स्वच्छतेसाठी 'वॉर्ड' स्तरावर ॲक्शन प्लान! राडारोडा पसरवणाऱ्यांवर महानगरपालिकेची नजर, आराखडा तयार करण्याचे आदेश

मुंबईच्या स्वच्छतेसाठी 'वॉर्ड' स्तरावर ॲक्शन प्लान! राडारोडा पसरवणाऱ्यांवर महानगरपालिकेची नजर, आराखडा तयार करण्याचे आदेश

Follow Us
Follow Us:

मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी केवळ नियमित साफसफाईवर अवलंबून न राहता, आता बांधकाम व पाडकाम राडारोड्याचे (सी अँड डी वेस्ट) संकलन शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. यासाठी प्रत्येक विभाग स्तरावर (वॉर्ड लेव्हल) स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी गुरुवारी दिले.’स्वच्छ सर्वेक्षण-२०२६’ आणि ‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील स्वच्छता कामांचा आढावा घेण्यासाठी ‘एम पश्चिम’ आणि ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.(फोटो सौजन्य – AI)

राज्यातील 364 पोलिसांना मिळणार बढती; सहाय्यक पोलिस निरीक्षक आता होणार पोलिस निरीक्षक

होते. यावेळी डॉ. जोशी यांनी मुंबईच्या स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत कामात अधिक पारदर्शकता आणि वेग आणण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला उपायुक्त भाग्यश्री कापसे, विश्वास मोटे, किरण दिघावकर, संतोषकुमार धोंडे, संध्या नांदेडकर, मनीष वळंजू यांच्यासह विविध विभागांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. उपनगरातील कचरा संकलनाचा अनुशेष आणि विशेष काळजीयोग्य कचरा यावरही यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे चर्चा करण्यात आली.

शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे राडारोडा टाकला जातो, ज्यामुळे स्वच्छतेच्या मानांकनावर परिणाम होतो. हा राडारोडा रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या परिसरातील अनधिकृत ठिकाणे शोधून काढावीत. तिथे किती प्रमाणात राडारोडा टाकला जातो आणि त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, याची इत्थंभूत माहिती आराखड्यात समाविष्ट करणे आता बंधनकारक असणार आहे.स्वच्छतेच्या कामात मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी डॉ. जोशी यांनी कठोर पवित्रा घेतला आहे. जे स्वच्छता कर्मचारी दीर्घकाळापासून रजेवर आहेत किया कामावर विनाकारण अनुपस्थित राहत आहेत, त्यांच्यावर तत्काळ प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

स्वच्छतेचे दोन स्तर, गांभीर्याने करणार पर्यवेक्षण

सकाळचे सत्र या सत्रात पालिकेच्या अधिकृत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून मुख्य रस्ते आणि परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे.दुपारचे सत्र नंतरच्या टप्प्यात रस्ते स्वच्छता योजना किंवा ‘पिक आर्मी ‘व्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येणार आहे.पर्यवेक्षण: केवळ कामगार नेमून चालणार नाही, तर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटी देऊन स्वच्छतेची खातरजमा करण्याचे निर्देश दिले. स्वच्छता केवळ कागदावर न राहता ती दृश्य स्वरूपात प्रतिबिंबित व्हायला हवी. यांत्रिकी पद्धतीने केली जाणारी स्वच्छता अधिक प्रभावी करा.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Action plan at the ward level for the cleanliness of mumbai municipal corporations eye on those who spread the radar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • Garbage Issue
  • Mumabi

संबंधित बातम्या

Mumbai News: पालिकेचा कारभार पेपरलेस होणार! सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार ॲपल कंपनीचे हायफाय टॅब
1

Mumbai News: पालिकेचा कारभार पेपरलेस होणार! सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार ॲपल कंपनीचे हायफाय टॅब

Buldhana News: कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’! घरोघरी कचऱ्याचे ढीग; पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त
2

Buldhana News: कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’! घरोघरी कचऱ्याचे ढीग; पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.